विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद महापालिका अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची एक कोअर कमिटी स्थापन केली. पण “पवार संस्कारित” भाकरी फिरवण्याच्या प्रयत्नांमध्ये अजितदादा कमी पडले. अजितदादांनी कोअर कमिटी मध्ये एकाही नव्या नेत्याला संधी दिली नाही, उलट मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळांना आणि आरोपांनी घेरलेल्या धनंजय मुंडेंनाच पुन्हा संधी दिली.
एकीकडे काँग्रेसने भाकरी फिरवण्याची कुठलीही बडबड न करता प्रत्यक्षात भाकरी फिरवून सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली. हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष नेमले. त्यांना काम करण्याची खुली सुट दिली. पण तरुणांना संधी देण्याच्या, भाकरी फिरवण्याच्या बाता मारणाऱ्या “पवार संस्कारित” नेत्यांना स्वतःच्या पक्षाबाबत मात्र तसे काही करता आले नाही. अजित पवारांनी नेमलेल्या कोअर ग्रुप मध्ये त्याच त्याच आणि जुन्या नेत्यांना संधी देण्यात पक्षाने धन्यता मानली.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांचा या कोअर ग्रुप मध्ये समावेश केला. जनकल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची धोरण निश्चिती यासंदर्भात हा कोअर ग्रुप काम करेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App