प्रतिनिधी
बारामती : उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकर विरुद्ध बारामतीकर असे राजकीय वातावरण सध्या तापले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना जुनीच असल्याचे म्हटले आहे. लाकडी निंबोडी योजनेबाबत जलसंपदा विभागाने सोलापूर जिल्ह्यात लोकांचा गैरसमज दूर केला पाहिजे. इंदापूर तालुक्यातील लोकांचे हक्काचे पाणी इंदापूरकरांना देत आहोत, असे अजित पवारांनी बारामतीत सांगितले. Ajit Pawar assigned the task of clearing the misunderstanding of Solapurkars to the Water Resources Department
इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजना फार जुनी योजना असून आता वर्क ऑर्डर निघाली आहे. सोलापुरातील माझे काही सहकारी त्याला विरोध करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होतो आहे, असे त्यांना वाटते आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पाण्याची नवीन जी योजना होती ती थांबली. त्यात थोडा वाद झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज काढण्याचे काम जलसंपदा विभागाला करावे लागेल, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, त्या पाण्याचे वाटप झाले आहे. प्यायला किती शेतीला किती औद्योगिक क्षेत्राला किती त्याचे नियोजन झाले आहे. याच्या बातम्या मात्र वेगळ्याच आल्या. राष्ट्रवादीच्याही काही लोकांनी त्याला विरोध केला आहे. सगळ्यांचा गैरसमज जलसंपदा विभागाने दूर करावा.
– लाकडी निंबोडी योजना
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more