विशेष प्रतिनिधी
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या जोरदार फटकेबाजीचा अनुभव आज बरमातिकरणा आला. लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांना टोला हाणताना त्यांनी महिलांना आवाहन केले. ते म्हणाले, मी तुमच्या मागे आहे. काही काळजी करू नका. तुम्ही माझ्या मागे राहा, नाहीतर तुम्ही म्हणाल लढ आणि जाल मागच्या मागे पळून.
अजित पवार म्हणाले, आम्ही योजना चांगल्या दिल्या आहेत. मी खोटं बोलत नाही. कारण मला खोट बोलून मला काही मिळावयचे नाही. सव्वा कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये आले. सोमे गोमे म्हणतात पैसे काढुन घेऊ. अरे काय काढून घेऊ तुझ्या घरचे आहे का? आमचे विरोधक म्हणतात, लवकर काढू नाहीतर पैसे जातील. या योजनेच्या विरोधात कोर्टात जातात तिथुन स्टे आणण्याचा प्रयत्न करतात.
महिलांचा मिळणारा प्रतिसाद सांगताना अजित पवार म्हणाले, इथे येऊन बघा, म्हणावं विरोधकांना. जाईल तिथे राख्याने हात भरतात. एक महिला मला म्हणाली, दादा तुझी वाट बघत साडे आठपासून बसले. घरी जायच्या आधी एक सेल्फी काढा आणि नवऱ्याला दाखवा. बघ कसा फोटो आहे, तू तरी कधी कौतुक केलं का? दादाने कौतुक केलं. गुलाबी रंग आणला, कारण महिलांना,मुलींना हा रंग आवडतो. एवढे फेटे बांधलेल्या महिला कधी बघितल्या आहेत का? ही मझ्या लाडक्या बहिणीची ताकद आहे. फेटा माझ्या माय माऊलींना चांगला दिसतो, म्हणून मी फेटा काढला. आमचे सरकार मुलींचे शिक्षण मोफत करणार आहे. गृहिणींना 3 गॅस सिलेंडर सरकार देणार आहे. . भावांना पण दिले ना. लाईट बिल माफ केले. मागच्या थकीत बिलाचे काय असा प्रश्न विचारतात. यावेळी सरकार निवडून द्या. तर तुमच्या योजना सुरू राहतील.
आम्ही 35 वर्ष घासली आहेत, आमच्यावर थोडा तरी विश्वास ठेवा असे सांगताना अजित पवार म्हणाले, काम करून टीका केली तर वेदना होतात. आम्हाला पण मन आहे ना? काही काही जण 10 वाजले तरी उठत नाही. 10 पर्यत आम्ही निम्मं काम हाणतो. जे काही करायचं राहिले ते करण्याचं धाडस फक्त माझ्यात आणि आमच्यात आहे.
जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत, तोपर्यंत संविधान बदलणार नाही, असे सांगून अजित पवार म्हणाले, सुप्रीम कोर्टाने एसटी आणि एससीबाबत निर्णय घ्यायला सांगितले. कुठल्याही प्रकारचा अन्याय होईल असा आम्ही निर्णय घेणार नाही. संविधानाबाबत आम्हाला आस्था आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App