कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हेरी गुड म्हणत, सरकारनं आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे घेतलेला हा एक खूप चांगला निर्णय आहे, असे कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणाºया सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले. After widening the gap between the two doses of Kovishield, Adar Poonawala said, “Very good, scientifically sound decision.”
प्रतिनिधी
लंडन : कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हेरी गुड म्हणत, सरकारनं आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे घेतलेला हा एक खूप चांगला निर्णय आहे, असे कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले
केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या सल्लागार गटाच्या शिफारशीवरून दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फायदेशिर असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करताना आदर पूनावाला म्हणाले, हा निर्णय खूप चांगला आहे. कारण हा निर्णय केंद्र सरकारला मिळालेल्या माहितीच्या आधारे घेण्यात आलेला आहे. दोन डोसमधलं अंतर वाढवणं हा एक चांगला वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला निर्णय आहे. कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती अशा दोन्ही गोष्टींच्या दृष्टीकोणातून हा निर्णय फायदेशीर आहे.
आत्तापर्यंत कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये ६ ते ८ आठवड्यांचं अंतर ठेवलं जात होते. मात्र, केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटानं कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधले अंतर वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आता केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस थेट १२ ते १६ आठवड्यांनंतर म्हणजेच ३ ते ४ महिन्यांनंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातली माहिती दिली आहे. मात्र, यावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, आधी दुसरा डोस ४ आठवड्यांनी दिला जात होता. त्यानंतर हा कालावधी ६ ते ८ आठवडे करण्यात आला आणि आता १२ ते १६ आठवडे झाला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे का? मोदी सरकारकडून आम्ही पारदर्शी कारभाराची अपेक्षा करावी का? मात्र, आता स्वत: आदर पूनावाला यांनी जयराम रमेश यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
द लॅन्सेट या जगप्रसिद्ध जर्नलनेही दोन डोसमधलं अंतर सहा आठवड्यांऐवजी 12 आठवडे राहावे असे म्हटलेआहे. दुसरा डोस तीन महिन्यांनंतर घेतला तर रोगप्रतिकारक शक्तीही पुढे फार काळपर्यंत टिकते असं लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेला अभ्यास सांगतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App