विशेष प्रतिनिधी
पुणे : दादांची प्रतिमा सावरायला ताईंपाठोपाठ पुतण्याही आला मदतीला!!, असे आज घडले. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकात दादा पालकमंत्र्यांचा उल्लेख करून येरवड्यातील तीन एकर सरकारी जमिनीचे प्रकरण बाहेर काढले त्याचे तपशीलवार खुलासे स्वतः मीरा बोरवणकर यांनी काल दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केले. After supriya sule now rohit pawar comes forward to save ajit pawar’s political image
मीरा बोरवणकरांच्या पत्रकार परिषदेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात खुलासे केले. पुस्तकात लिहिलेल्या कुठल्याच प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. आपली कुठल्याही फाईलवर सही नाही, असा खुलासा अजितदादांनी केला.
पण काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांच्या व्यवहारावरचे संशयाचे मळभ कायम ठेवले. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार पुढे आले आणि त्यांनी अजितदादांचा बचाव करत भाजपवरच निशाणा साधला.
अजित पवारांवरच्या आरोपांची स्टोरी तशी इंटरेस्टिंग आहे. “पुणे जिल्ह्यातले जमीन व्यवहार आणि पवार” हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणाचे एक वेगळे “ग्रंथ प्रकरण” आहे. त्यातले फक्त येरवड्यातल्या 3 सरकारी जमिनीचे प्रकरण मीरा बोरवणकरांच्या पुस्तकाच्या निमित्ताने बाहेर आले, पण त्यातही राजकीय टाइमिंग साधले गेल्याचा आरोप झाला. तो मुद्दा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला. अजित पवार भाजप बरोबर सत्तेवर आल्यानंतर विशिष्ट प्रकरणे काढून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे केले जात आहे. “तू मला सोडून गेलास, तर मी तुला सोडणार नाही”, असे येरवडा प्रकरणात घडते आहे, असे शेलार म्हणाले.
पण त्यापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदारांचा बचाव केला होता. मीरा बोरवणकरांचे पुस्तकच मी वाचलेले नाही. त्यामुळे मी काय बोलणार?? मी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही, असे सांगून सुप्रिया सुळे यांनी तो विषय थोडक्यात संपविला होता.
पण त्यादिवशी आमदार रोहित पवारांनी मात्र ज्या अर्थी विरोधी पक्ष नेते म्हणतात, त्याअर्थी त्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आमदार रोहित पवार हे आपल्या काकांच्या विरोधात गेल्याचे माध्यमांनी बातम्या नमूद केले होते, पण आज मात्र रोहित पवारांनी अजितदादांची बाजू सावरून धरली आणि भाजपवर निशाणा साधला. अजितदादांची ताकद आणि प्रतिमा कमी करण्याचा भाजपचा डाव आहे. महाराष्ट्रातल्या लोकनेत्यांना संपवणे हे भाजपचे काम आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागतो आहे. मोहिते पाटलांसारख्या भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे महत्त्व कमी करण्यात आले आहे, तसेच अजितदादांच्या बाबतीत घडत आहे, अजितदादांना उत्तरे द्यावी लागत आहेत भाजपचे कोणीही नेते बोलत नाहीत, असा आरोप रोहित पवारांनी केला.
पण आज हे सगळे बोलताना आपणच काकांच्या चौकशीची परवाच मागणी केली होती, हे रोहित पवार विसरले आणि आज काकांच्या बाजूने जाऊन उभे राहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App