विशेष प्रतिनिधी
पुणे : Raj Thackeray मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 28) पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. राज ठाकरे यांनी उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पराभूत उमदेवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. निवडणुकीत कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले यावरही बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सर्वांची मते ऐकून घेतली. तसेच ईव्हीएमबाबत पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या. या सर्व घडामोडींवर राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत.Raj Thackeray
राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत राज्यातील मनसेचे पराभूत झालेले 82 उमेदवार तसेच त्या-त्या जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांकडे विचारणा करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या गावात एकही मत न मिळाल्याचे म्हटले आहे. हडपसर मतदारसंघात मतमोजणीमध्ये मनसेच्या उमेदवाराला 1000 मते जास्त मिळाली. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 600 मते जास्त मिळाल्याचे सांगण्यात आले. पोस्टल मतमोजणीवेळी महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज दिसत होता. मात्र, ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी झाल्यानंतर सगळे निकाल वेगळे लागायला लागले. अशा अनेक शंका मनसेच्या उमेदवारांनी या बैठकीत सांगितल्या.
स्वत:ला फटका बसल्याने सगळे एकत्र आले
सर्व पराभूत उमेदवारांचे म्हणणे राज ठाकरे यांनी ऐकून घेतले. घरातील लोकांचे मत देखील मिळाले नसल्याचा दावा उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर केला. दरम्यान, 2014 पासून राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात बोलायला सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळी कोणताही पक्ष सोबत आला नाही. यंदाच्या निवडणुकीत त्यांना फटका बसल्याने सगळे एकत्र आले आहेत. ईव्हीएमविरोधात जसे पुरावे मिळतील, त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App