पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा चांगलाच अडकला होता.त्याला तब्बल 2 महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला होता.50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. After coming out of jail Raj Kundra took a big step
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणी जेलतून बाहेर आल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने मोठे पाऊल उचलले आहे. राज कुंद्राने सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे. महत्वाचं म्हणजे राज कुंद्राने त्याचे इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट डिलीट केले आहे.आता राज कुंद्राचे इंस्टाग्राम आणि ट्विटरवर त्याचे खाते आता दिसत नाही. यावर अशी चर्चा चालू आहे की , कदाचित लोकांपासून दूर राहण्यासाठी राज कुंद्राने सोशल मीडियाचा निरोप घेतला असावा.
याआधी राज कुंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असायचा. राजने अनेकदा पत्नी शिल्पा शेट्टीसोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. त्याच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांनी प्रचंड लाईक केले आहे.पण आता त्याने सोशल मीडियावरून अकाउंट डिलीट केलं आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा चांगलाच अडकला होता.त्याला तब्बल 2 महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला होता.50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.१९ जुलै रोजी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती.
सध्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना आणि सभांना जाण्याचे राज कुंद्रा टाळत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणापासून राज कुंद्रा कुटुंबासोबत दिसत नाही.अलीकडेच शिल्पा तिची मुले विआन आणि शमिशासोबत अलिबागमध्ये दिसली होती पण त्यावेळीही राज कुंद्रा तिथेही दिसला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App