वृत्तसंस्था
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी आमची जुनी मैत्री आहे ती पुढे नेण्यासाठीच मी त्यांना आज भेटलो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.Aditya Thackeray met Mamata Banerjee at Hotel Trident in Mumbai
आम्ही येथे ममता बॅनर्जी यांचे स्वागत करण्यासाठी आलो आहोत. त्या दोन-तीन वर्षांपूर्वी मुंबईत आल्या होत्या. तेव्हा देखील आमची भेट झाली होती. आमच्यात मैत्री संबंध आहेत ती मैत्री पुढे नेण्यासाठीच आजची भेट होती, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
सुशांतसिंगच्या हत्येत आदित्य ठाकरे यांचा सहभाग, पुरावे देऊनही अटकेची कारवाई झाली नसल्याचा नारायण राणे यांचा आरोप
अर्थातच या भेट मैत्री भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. परंतु प्रामुख्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी ही भेट होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी ममता बॅनर्जी यांनी यावेळी आवर्जून केली. तब्येतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांना आज भेटू शकले नाहीत. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे होते. तीनही नेत्यांनी आपल्यातल्या मैत्रीला या भेटीत उजाळा दिला.
Maharashtra Minister and Shiv Sena leader Aaditya Thackeray and party leader Sanjay Raut met West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee today in Mumbai. pic.twitter.com/yGcZ1sT9Ck — ANI (@ANI) November 30, 2021
Maharashtra Minister and Shiv Sena leader Aaditya Thackeray and party leader Sanjay Raut met West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee today in Mumbai. pic.twitter.com/yGcZ1sT9Ck
— ANI (@ANI) November 30, 2021
We welcome her to Mumbai & Maharashtra. There has always been a friendship. We had met her even 2-3 years back when she visited Mumbai. We came to carry forward that friendship. We discussed many issues but we came here to welcome her to Mumbai: Maharashtra Min Aaditya Thackeray pic.twitter.com/uKHtA2X44o — ANI (@ANI) November 30, 2021
We welcome her to Mumbai & Maharashtra. There has always been a friendship. We had met her even 2-3 years back when she visited Mumbai. We came to carry forward that friendship. We discussed many issues but we came here to welcome her to Mumbai: Maharashtra Min Aaditya Thackeray pic.twitter.com/uKHtA2X44o
अर्थात ममता बॅनर्जी आणि ठाकरे यांच्या मैत्रीचा महाराष्ट्रात ठाकरे यांच्या राजकारणासाठी आणि पश्चिम बंगाल तसेच दिल्लीतल्या ममता बॅनर्जी यांच्या राजकारणासाठी नेमका काय, कसा आणि कोणता उपयोग होणार?, या विषयी मात्र आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला नाही. त्यामुळे त्यावर त्यांनी काही भाष्य केले नाही. ममता बॅनर्जी आजच्या मैत्री भेटीनंतर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App