विशेष प्रतिनिधी
मुंबई : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज तिसऱ्यांदा भेट घेतली या भेटीत त्यांनी उघडपणे काही वेगळ्या मागण्या केल्या, पण त्या भेटी मागे नेमके त्यांच्या मनात काय आहे??, हे मात्र उलगडायला वेळ लागला नाही.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून त्यांच्या वरळी मतदारसंघातले काही प्रश्न मांडले. मुंबई संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले आणि त्याचवेळी त्यांनी मुंबईतल्या निवृत्त पोलिसांना त्यांच्या सरकारी क्वार्टर्स मध्ये राहण्याबद्दल जो दंड आकारण्यात येतो तो कमी करायची विनंती आदित्य ठाकरे यांनी केली.
पण या झाल्या उघड मागण्या. त्या पलीकडे देवेंद्र फडणवीस यांची गेल्या महिनाभरातच तिसऱ्यांदा भेट घेण्यामागचे आदित्य ठाकरे यांचे खरे कारण राजकीय स्वरूपाचे होते. आदित्य ठाकरे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. शिवसेना पक्षाकडे सध्या विधानसभेत 20 आमदार आहेत. महाविकास आघाडीतला तो सगळ्यात मोठा घटक पक्ष असल्याने विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेचा दावा आहे.
बीड – संतोष देशमुख प्रकरणात पवारांचे आधी मुख्यमंत्र्यांना पत्र, नंतर फोन; फडणवीसांनी संपविला एका वाक्यात विषय!!
परंतु विधानसभेत आवश्यक असलेले 49 हे संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद दिलेच पाहिजे असे सरकारवर देखील बंधन नाही, तरी देखील सरकारने शिवसेनेची विरोधी पक्षनेते पदाची मागणी मान्य करावी हा सुप्त हेतू मनात ठेवून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतर एकदा आदित्य ठाकरे मुंबईत फडणवीसांना भेटले होते आणि आज पुन्हा त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यामागे विरोधी पक्ष नेते पदावर आपला दावा सांगणे हेच कारण असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App