विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditi Tatkare राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. त्यानंतर अनेकांना पालकमंत्री पद मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांना न मिळाल्याने नाराजीचे सुर उमटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रायगडचा पालकमंत्री म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नेते व रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची निवड होणार अशी चर्चा होती, पण त्यांना वगळण्यात आले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे भरत गोगावले यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.Aditi Tatkare
मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी शनिवारी रात्री पासूनच महाड जवळील मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. रविवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील एकूण 32 गोगावले समर्थक आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पदाचे राजीनामे देखील दिले आहेत. यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, भरत गोगावले यांनी त्यांच्या रायगड येथील शिवनेरी निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाला कोणत्याही स्वरूपात गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. असे असताना देखील अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भरत गोगावले म्हणाले, आपल्याला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून एवढी काळजी करू नका तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत आणि ते मी कधीच विसरणार नाही अशा शब्दात भरत गोगावले यांनी संतापलेल्या शिवसैनिकांची मन जिंकली. भरत शेठ हा तुमचा शेठ आहे मी ईतर कोणाचा शेठ नाही असे भावनिक आवाहन करत भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना यावेळी शांत केले. पालकमंत्री पदाच्या निर्णयावर माझी वरिष्ठ मंडळींसोबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App