विशेष प्रतिनिधी
नांदेड : Ashok Chavan राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता पक्षांची तयारीही सुरू झाली आहे. काही नेत्यांनी स्वबळावर लढणार असल्याचे देखील संकेत दिले आहेत. यावर भाजप नेते व खासदार अशोक चव्हाण यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले आहे.Ashok Chavan
अशोक चव्हाण म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेमके असे लढायचे, याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आम्ही वरिष्ठांना कळवू. मात्र, नांदेड शहर आणि जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे. जिथे भाजपला अधिक संधी आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे. यावरून त्यांनी नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजप सदस्य नोंदणीची जिल्हा आढावा बैठक शनिवारी नांदेड येथे पार पडली. यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची असेल तर निवडणूक स्वबळावर लढवू, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे. त्यामुळे स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष आमने सामने येणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. आपली ताकद शहरात आहे, जिल्ह्यात आहे. आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही, मात्र आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला अधिकार आहे. त्यात गैर मानण्यात काहीच कारण नाही, असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी शक्तिपीठ महामार्गाला देखील विरोध असल्याचे म्हंटले आहे. नांदेडमधील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. अशोक चव्हाण यांनी जे शेतकऱ्यांचे मत आहे, तेच माझे मत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच येथील शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत व यावर कसा तोडगा काढला जाईल, यावर मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App