काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप; बाबासाहेबांचा शब्द धुडकावून दिले धर्माच्या आधारे आरक्षण!!; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Addressing the Vijay Sankalp Shankhnaad Maharally in Surguja, Chhattisgarh, modi

विशेष प्रतिनिधी

रायपूर : काँग्रेस माता-भगिनींच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा हिशेब लावून त्यांची संपत्ती घुसखोरांना वाटेल, असा आतापर्यंतचा सर्वांत प्रखर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात काँग्रेसने थेट निवडणूक आयोगात धाव घेतली, पण तरी देखील पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरचे प्रखर हल्ले थांबवलेले नसून त्यांनी त्याहीपेक्षा अधिक प्रखर हल्ले आज केले. छत्तीसगड मधल्या सुरगजा मधून काँग्रेसवर प्रखर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याची टीका केली. इतकेच नाही, तर काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द धुडकावून देशात धर्माच्या आधारावर आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न चालवण्याचाही आरोप केला. Addressing the Vijay Sankalp Shankhnaad Maharally in Surguja, Chhattisgarh, modi

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. ज्या वेळेला राज्यघटना तयार होत होती, त्यावेळेला देशातल्या सर्व विद्वानांनी मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक निर्णय घेतला होता, तो म्हणजे देशामध्ये कोणत्याही परिस्थितीत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही. आरक्षण फक्त आणि फक्त दलित, आदिवासी, पिछडे यांनाच दिले जाईल. त्यामध्ये कुठलाही धर्माच्या आधाराचा अंतर्भाव असणार नाही. हे बाबासाहेबांचे आणि इतर विद्वानांचे शब्द होते. त्यानुसारच त्यांनी राज्यघटना तयार केली.

परंतु, काँग्रेसी सरकारांनी बाबासाहेबांचे आणि आपल्याच राजकीय पूर्वजांचे मत गुंडाळून ठेवून काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशात धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिले. इतकेच नाही, तर 2009 मध्ये 2014 च्या जाहीरनाम्यान मध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण संपूर्ण देशभर लागू करण्याचा मनसूबा काँग्रेसने जाहीर केला होता. त्याचबरोबर धर्माच्या आधारे देण्यात येणारे आरक्षण हे दलित आदिवासींना दिलेल्या 15 % टक्के आरक्षणातून काही हिस्सा काढून घेऊन ते मुस्लिमांना देण्याचे कारस्थान त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्यांनी रचले होते. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचे शब्द राज्यघटनेची पवित्रता हे सुद्धा धुडकावून लावले होते. काँग्रेसची मानसिकता च मुस्लिम लीगच्या छापाची झाली आहे, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या 2024 च्या जाहीरनाम्याचे वाभाडे काढले.

काँग्रेस आता पूर्णपणे अर्बन नक्षलवाद्यांच्या कब्जात गेली आहे. मुस्लिम तुष्टीकरणाच्या पलीकडचे पाऊल टाकत काँग्रेसचा देशभरातल्या सर्व संस्थांचा, सर्व व्यक्तींचा सर्वे करून त्यांच्याकडच्या संपत्तीचे विवरण मागणार आहे आणि ती संपत्ती देशातल्या घुसखोरांना देण्याचा त्यांचा बदइरादा आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच केला होता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी संतप्त होऊन निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. निवडणूक आयोगात मोदींच्या “हेट स्पीच” विषयी तक्रार केली होती. त्याबद्दल निवडणूक आयोग अद्याप निर्णय घ्यायचा आहे. परंतु, तो निर्णय येण्याआधी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरचा आपला हल्ला अधिक प्रखर करून काँग्रेसचा मुस्लिम मानसिकतेचा बुरखा फाडला आहे.

Addressing the Vijay Sankalp Shankhnaad Maharally in Surguja, Chhattisgarh, modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात