मी “भोसले” नसल्याचा एक तरी पुरावा द्या, अन्यथा माफी मागा; आचार्य तुषार भोसलेंचे शरद पवारांना खणखणीत प्रत्युत्तर


प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या बद्दल अनेक लोक आडनावे बदलून फिरतात. तुषार भोसलेंचे शाळेतले आडनाव भोसले आहे का?, हे तपासा, असे वक्तव्य केले होते. Acharya Tushar Bhosle’s dignified reply to Sharad Pawar

मात्र पवारांच्या या वक्तव्यावर तुषार भोसले यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले असून आपण “भोसले” नसल्याचा एक तरी पुरावा द्या अन्यथा माफी मागा, असा गंभीर इशारा दिला आहे. 32 वर्षांच्या आचार्य तुषार भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन 82 वर्षांच्या शरद पवारांना दिलेले आव्हान महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाले आहे.

तुषार भोसले यांनी एकापाठोपाठ एक मुद्दे मांडून पवारांचा सर्व युक्तिवाद खोडून काढला आहे.

तो असा :

  •  शरद पवारांनी काल मिडीयात सांगितले की अनेक लोक नांव बदलून फिरतात ; भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांचं शाळेत आडनांव ‘भोसले’ आहे का ? हे तपासा
  •  ३२ वर्षीय आचार्य तुषार भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ८२ वर्षीय शरद पवार यांना अक्षरशः उघडे पाडले.
  •  स्वतःचे आणि वडिलांचे शाळा सोडल्याचे दाखले मिडीयासमोर दाखवत तुषार शालिग्राम भोसलेच असल्याचे सिद्ध केले
  •  सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या तरुणाला भारतीय जनता पक्षाने संधी दिली आणि त्याच्या धर्मकार्याने पवार इतके धास्तावले की त्यांनी त्यांचे आवडते ‘जातीवादाचे’ विषारी हत्यार बाहेर काढले.
  •  ‘मराठा, अध्यात्म आणि भाजप’ हे समीकरण पवारांना पचनी पडत नसल्याने ४ वेळा मुख्यमंत्री, अनेक वर्ष केंद्रीय मंत्री आणि देशातले ज्येष्ठ नेते असलेल्या पवारांनी ३२ वर्षीय तरुणाबद्दल समाजात खोटा कांगावा करणं शोभत नाही.
  •  पवार साहेब, मी डंके की चोट पर सांगतो , तुमच्या दुर्दैवाने मी भोसलेच आहे, मी मराठा आहे आणि होय मी भारतीय जनता पक्षात आहे!!
  •  येत्या आठ दिवसांत माझे आडनांव भोसले नाही याचा एकतरी पुरावा द्या अन्यथा माझी माफी मागा, असे आव्हान आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांना दिले आहे.

Acharya Tushar Bhosle’s dignified reply to Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात