विशेष प्रतिनिधी
मुंबई :Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत भाजपचे जे आमदार गैरहजर होते त्यांना चांगलेच सुनावले असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाजप पक्षातील संघटन कौशल्यावर भाष्य केले, मात्र दुसरीकडे याच पक्षातील काही आमदार कार्यक्रमात अनुपस्थित असल्याचे दिसून आले.Chief Minister Fadnavis
अनुपस्थित असलेल्या आमदारांना उद्देशून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांनी सुट्टी घेतली आहे तर काहींनी न कळवताच अनुपस्थित राहिले आहेत. त्यातले काही मला मंत्रालयात भेटलेत मात्र कार्यशाळेत अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना मी विचारतो ते कार्यशाळेत अनुपस्थित आहेत? सरतेशेवटी जे काम करतात त्यांना आपण जाब विचारतो जे गायब असतात त्यांना आपण विचारत नाही. त्यामुळे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांनी विचारणा करावी. तसेच स्पष्टीकरण देखील घेण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमात उद्देशून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की जो प्रामाणिकपणे आपले संघटन राबवतो. देशात प्रत्येक पक्षाला आपले संविधान तयार करावे लागते ते संविधान निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते आणि त्या संविधानाच्या अनुरूप लोकशाही पद्धतीने आपले पूर्ण रचना उभी करावी लागते. आपल्याला कल्पना आहे हे जरी कायद्याने खरे असले तरी अशा प्रकारची संपूर्णपणे लोक तांत्रिक पद्धतीने संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा जर कुठला पक्ष आहे तर तो एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, याच संपूर्ण संघटनेचा भाग म्हणून आपण सुरुवात प्राथमिक सदस्यांपासून करतो. आपल्याला माहित आहे की देशामध्ये प्राथमिक सदस्यतेची मोहीम संपली. सुरू झाली त्यावेळेस आपल्या निवडणुका होत्या आणि म्हणून आपण केंद्रीय भाजपला विनंती केली होती आणि केंद्रीय भाजपने हरियाणा असेल महाराष्ट्र असेल झारखंड या राज्यांना सूट दिली होती की त्यांनी त्यांच्या निवडणुकीनंतर हे करावं. देशभरामध्ये जवळपास संघटन पर्व हे संपुष्टात आले आहे आपल्याला एक्सटेंडेड वेळ मिळाला आहे. आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्राला सांगितले की महाराष्ट्रात दीड कोटी प्राथमिक सदस्य तयार करेल. ज्या वेळेस या पक्षाचा मोठा विस्तार, 2014 मध्ये आपले अमित भाई शहा हे अध्यक्ष झाल्यानंतर जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपला बनवायचे आहे असा निर्णय घेऊन आपण संघटन बरोबर सुरू केले आणि देशामध्ये 11 कोटी सदस्य केले चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा सात कोटीचा रेकॉर्ड आपण मोडीत काढला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App