वृत्तसंस्था
नाशिकः अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही. शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे, तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले. A tribal who fights against injustice is not a Naxalite, Shivaji Maharaj’s kingdom was the Hindavi Swarajya of the ryots, asserted Sharad Pawar
सोनोशी गावात (ता. इगतपुरी) क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ आयोजित सन्मान बाडगीच्या माचीच्या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ उपस्थित होते. ते म्हणाले की, पिढ्यान पिढ्या या देशाचा मूळ मालक असलेल्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज आहे. राघोजी भांगरे यांचे स्मारक आपण उभारतो आहोत. आदिवासी समाजाची तरुण पिढी आल्याचा आनंद आहे. पुढच्या आठवड्यात नक्षली भागात मी स्वतः जाणार आहे. तिथल्या तरुणांशी संवाद साधणार आहे.
बिरसा यांचा वारसा जपा
पवार पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या राज्याला भोसल्यांचे राज्य असे कुणी केले नाही. ते रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्याचे राज्य असे म्हटले जाते. भीमा कोरेगावला ऐतिहासिक घटना घडली, पण त्याचा देशात वाद झाला. पण तिथे लढणारा व्यक्ती आदिवासी होता. बिरसा यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आदिवासींच्या जमिनी बळकावल्या
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, वनवासी आश्रमच्या निमित्ताने चांगले काम चालू आहे, असे चित्र आहे. मात्र, त्या आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होतो आहे. मुंबईत कंटाळलेले लोक इथे जमिनी घेऊन अधिवासींना कामाला ठेवताहेत. आरक्षण काढण्यासाठीच काही लोक तुम्हाला वनवासी म्हणत आहेत, असा दावा त्यांनी केली.
पेट्रोल, गॅस महाग : भुजबळ
पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी नेहमी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. आजूबाजूची जागा डिफेन्ससाठी संपादित करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पवार साहेबांनी आदिवासींच्या पाठीशी उभे राहून मदत केली. काही लोक म्हणतात १९४७ ला मिळालेले स्वतंत्र्य म्हणजे भीक आहे. २०१४ नंतर काय मिळाले. पेट्रोल महाग, गॅस महाग. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही त्यांना पुरस्कार दिला, असा टोलाही त्यांनी हाणला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App