विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एक तीन मजली इमारत सोमवारी रात्री एका पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. परंतु रहिवाशांनी अगोदरच धोका ओळखून इमारत सोडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. A three-story building collapsed in Pachore of jalgav District ; There is no loss of life as the tenants have already vacated the premises
बांधकाम करताना पाच वर्षांपूर्वी काही तांत्रिक दोष राहिल्याने शहरातील बाहेरपुरा भागात असलेली तीन मजली इमारत कोसळली. पाचोरा येथे व्हीपी रोडवर मुंबई येथील रहिवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत पाच वर्षांपूर्वी उभारली होती. मात्र, पावसाने इमारतीला तडा गेला होता. त्यामुळे तेथील भाडेकरू यांनी इमारत नुकतीच धोका ओळखून सोडली होती. कालपासून रिमझिम पाऊस पडत होता. रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
यापूर्वी नगरपरिषदने खबरदारी घेऊन हा रोड बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परिसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. इमारत एक कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App