विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने १९८२ मध्ये सर्व राज्य सरकारांना हरिजन’ हा शब्द वापरू नये, असे निर्देश दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला आहे. २०१० मध्ये, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पण काँग्रेसने ‘हरिजन’ हा शब्द का वापरला? याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे अहंकार. काँग्रेससारख्या सापाने वेळोवेळी दलितांना आपले खरे विषारी दात दाखवले, असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (दि.१६) ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
जब गांधी जी ने अछूतों के लिए हरिजन शब्द का इस्तेमाल करना शुरू किया, तो बाबासाहेब अंबेडकर ने इसका कड़ा विरोध किया और कहा कि यह अपमानजनक और धोखा देने वाला शब्द है, और जाति-भेद और अछूत प्रथा के असली मुद्दे को चुपने करने का प्रयास है। शायद कांग्रेस भूल गई है कि 1982 में केंद्र… pic.twitter.com/d9eoOA9rBr — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 16, 2024
जब गांधी जी ने अछूतों के लिए हरिजन शब्द का इस्तेमाल करना शुरू किया, तो बाबासाहेब अंबेडकर ने इसका कड़ा विरोध किया और कहा कि यह अपमानजनक और धोखा देने वाला शब्द है, और जाति-भेद और अछूत प्रथा के असली मुद्दे को चुपने करने का प्रयास है।
शायद कांग्रेस भूल गई है कि 1982 में केंद्र… pic.twitter.com/d9eoOA9rBr
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 16, 2024
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
गांधीजींनी अस्पृश्यांसाठी हरिजन हा शब्द वापरण्यास सुरुवात केली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यास कडाडून विरोध केला आणि म्हटले की हे एक अपमानास्पद आणि फसवे शब्द आहे आणि जातिवाद आणि अस्पृश्यतेच्या वास्तविक समस्येवर गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे.
1982 मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दलितांसाठी हा शब्द वापरू नये, असे निवेदन दिले होते, हे कदाचित काँग्रेसला विसरले आहे. 2010 मध्ये, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
पण काँग्रेसने हरिजन हा शब्द का वापरला? याचे एकच कारण असू शकते – अहंकार.
काँग्रेससारख्या सापाने दलितांना आपले खरे विषारी दात वेळोवेळी दाखवले आहेत.
आता दलितांनी ठरवायचे आहे की कोणावर विश्वास ठेवायचा – एक कॉस्मेटिक मेकओव्हर आणि कुटुंबाच्या तालावर नाचणारी कठपुतली काँग्रेस?
ॲड. आंबेडकर यांच्या या पोस्टवर आता देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App