प्रतिनिधी
मुंबई : शिवप्रताप भूमीवर म्हणजेच प्रतापगडावर अफजल खान वधाचा पुतळा उभारावा अशी अनेक वर्षांची शिवभक्तांची मागणी अखेर शिंदे – फडणवीस सरकारने मान्य केले आहे. प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरी नजीकच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेत अफजल खान वधाचा भव्य पुतळा राज्य सरकार उभा करणार आहे. A grand statue of Chhatrapati shivaji and Afzal Khan pratapgad
शिंदे फडणवीस सरकारचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये मंगल प्रभात लोढा म्हणतात : शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे! #shivpratap #छत्रपतीशिवाजीमहाराज #प्रतापगड
आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या राजवटीत अफजलखान वधाचे पोस्टर अथवा चित्र जाहीरपणे लावणे हा देखील गुन्हा ठरविण्यात आला होता. दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक हिंदुत्ववादी संघटना शिवप्रताप दिनी अफजलखान वधाचा देखावा सादर करीत असत. अथवा मोठे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावत असत. परंतु या सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने अनेक खटले चालवले होते.
या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिवप्रताप दिनी 10 ऑक्टोबर 2022 रोजी अफजलखानाच्या कबरी नजीकचे अतिक्रमण बुलडोझर लावून हटविले आणि आता त्या रिकाम्या झालेल्या जागेवर अफजल खान वधाचा भव्य पुतळा आणि शिवप्रतापाचे राईट अँड साऊंड शो मार्फत दर्शन अशी भव्य योजना सरकारने आखली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App