आफताब – श्रद्धा लव्ह जिहादवर संताप उसळला असताना मराठी माध्यमांचा व्हिक्टीम कार्ड आणि पॉझिटिव्ह स्टोरीचा फंडा


विशेष प्रतिनिधी

आफताब अमीन पूनावालाने श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या केल्यानंतर लव्ह जिहादच्या मुद्द्यावर देशभरात संताप उसळला असताना, विशेषतः सोशल मीडियावर त्याचे प्रखर प्रतिबिंब पडले असताना मराठी माध्यमांनी मात्र वेगवेगळ्या स्टोरीज रंगवून देत आफताब पूनावालाच्या बाजूने व्हिक्टीम कार्ड खेळायला सुरुवात केली आहे, इतकेच नाही तर मुस्लिमांमधल्या वयाच्या दीर्घ अंतरातल्या पॉझिटिव्ह लव्ह स्टोरीज देऊन लव्ह जिहादच्या विरोधातील संतापाची धग कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. Victim card of Marathi media as outrage over Aftab – Shraddha Love Jihad erupted

आफताब आणि श्रद्धा यांच्या विषयीच्या बातम्या देताना आफताबची मन:स्थिती कशी दुभंगलेली होती, आफताब आयुष्यात कसा एकलकोंडा होता, त्याला आपण पुढे काय करायचे हे कसे समजत नव्हते, वगैरे वर्णने मराठी माध्यमांनी तिखट मीठ लावून केली आहेत. इतकेच नाही तर त्याच्या आई-वडिलांची बाजू देखील सर्वसामान्यपणे न देता जणू काही आफताब कसा एकलकोंडा राहात होता, तो श्रद्धाचा इतका निर्घृण खून करेल हे कसे शक्य नव्हते, अशा पद्धतीने बातमी दिली आहे. आफताब 12 वी पर्यंत शिकला होता. तो आई-वडिलांपासून दूर राहत होता. आई-वडिलांनी श्रद्धा बरोबर राहू नको असे त्याची समजूत काढली होती आणि आता आई-वडील आता आफताबला अटक झाल्यानंतर दिल्लीला गेले आहेत, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. आफताबच्या मनःस्थितीचे वर्णन मराठी माध्यमांनी अशा शब्दात केले आहे की जणू काही त्याच्याकडून चुकून श्रद्धाचा खून झाला आहे, असा समज निर्माण व्हावा आणि त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण व्हावी.

श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आफताब एकलकोंडा

पालघरच्या 26 वर्षीय श्रद्धाची मुंबईत राहणाऱ्या 28 वर्षीय आफताब पूनावालाने हत्या करून तिच्या मृतदेहाचे एक-दोन नव्हे तर तब्बल 35 तुकडे केले. ही निर्घृण घटना दिल्लीत घडली. आफताबचे कुटुंब मुंबईत राहत होते. त्यांनी सांगितले की, आफताब एक सरासरी विद्यार्थी होता. त्याचे कधीही मित्र किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद झाले नाहीत.

आफताबने उच्च शिक्षण घ्यावे अशी त्याचे वडील अमीन यांची इच्छा होती. पण त्याने पदवीपर्यंतच शिक्षण अर्धवट सोडले. त्याची व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यामुळे वडिलांच्या इच्छेशिवाय तो शिक्षण अर्धवट सोडून दिल्लीला गेला.

आफताब अशी हत्या करेल यावर कुटुंबाचा विश्वास नाही

आफताब आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची निघृण हत्या करू शकतो यावर त्याचे मित्र आणि कुटुंबीयांचा विश्वासच बसत नाही. एका कौटुंबिक मित्राने सांगितले की, ‘आफताब स्वभावाने एकलकोंडा होता. आयुष्यात काय करावे याविषयी त्याच्या मनात संभ्रम होता. त्याच्या वडिलांना त्याच्या भविष्याविषयी चिंता वाटायची. त्यामुळे त्याने एवढी क्रूरपणे हत्या केली असावी यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.

खोजा समुदायाशी संबंधित आफताबच्या कुटुंबाने त्याला श्रद्धापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण तो एव्हरशाइन सिटी, वसईतील एक किरायाच्या घरात राहण्यासाठी गेला. तो आपले आई-वडील आणि छोट्या भावाच्या संपर्कात होता. कौटुंबिक मित्राने सांगितले की, श्रद्धा त्यांना कधीच भेटली नाही.

BBAला प्रवेश घेण्यासाठी शिक्षण सोडले

2011 मध्ये सेंट पीटर्स ज्यूनियर कॉलेजमधून 12 वी पास झाल्यानंतर तो बिझनेस करण्यासाठी पुण्याला गेला. काही महिन्यांनंतर तो परत आला. त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्यासाठी त्याने सांताक्रूझ स्थित एका कॉलेजात BBAला प्रवेश घेतला. पण त्याच्या शाळेतील एका मित्राने सांगितले की, त्याने शिक्षण मध्येच सोडून अनेक गोष्टींत आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला.

अनेक मुलींशी संबंध

आफताबने ग्राफिक डिझायनर म्हणूनही काम केले. 2019 मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून त्याची श्रद्धाशी ओळख झाली. बाइक व ट्रेकिंगची त्याची आवड होती. श्रद्धालाही याची आवड होती. त्यामुळे ते एकमेकांकडे आकर्षित झाले. एका मित्राने सांगितले की, श्रद्धा व आफताबने लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वजण थक्क झाले. कारण, आफताब यापूर्वीही रिलेशनशिपमध्ये राहिला होता.

आफताबच्या आई-वडिलांना श्रद्धा आणि आफताब दिल्लीत शिफ्ट झाल्याची माहिती नव्हती. त्याने जुलैमध्ये त्यांना नोकरी मिळाल्याची माहिती दिली. तसेच श्रद्धासोबतचे संबंध संपुष्टात आल्याची कल्पनाही दिली. वसईत पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याचे आई-वडील काळजीत पडले. त्यांचे कुटुंब 3 महिन्यांपूर्वीच मीरा रोडवर शिफ्ट झाले होते. सध्या ते मुलाच्या अटकेनंतर दिल्लीला गेले आहेत.

वर उल्लेख केलेले असतात त्या कुटुंबाचे आणि मित्रांचे सगळे उल्लेख आणि भाषा आफताब विषयी सूप्त सहानुभूती किंवा सॉफ्ट कॉर्नर निर्माण व्हावा अशीच वापरली आहे.

इतकेच नव्हे, तर आफताब श्रद्धाच्या स्टोरीचे टायमिंग साधून मराठी माध्यमांनी मुस्लिम लव्ह स्टोरीचे पाकिस्तानातले उदाहरण देखील पॉझिटिव्ह स्टोरी म्हणून दिले आहे. मराठी माध्यमांनी लाहोर मधल्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याने 19 वर्षाच्या मुलीशी प्रेम विवाह कसा केला याचे चटपटीत वर्णन केले आहे.

– इश्क उम्र नही देखता

लाहोर, मॉर्निंग वॉकला निघालेल्या 19 वर्षीय तरुणीचा  एका 70 वर्षीय म्हाताऱ्यावर जीव जडला, दोघांमध्ये काही बोलणे झाले आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. इतक्यावरच न थांबता त्यांनी संसार देखील थाटला आहे. या जोडप्याची प्रेमकहाणी व्हायरल झाली आहे. या जोडप्याचे नाव लियाकत आणि शमाईला असे असून ते दोघे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहतात. 70 वर्षीय लियाकत अली हे त्यांच्या प्रेमप्रकरणावर खुलेपणाने बोलत आहेत. लियाकतने पहिल्या भेटीबद्दल सांगितले की, ‘एकदा शमाइला फिरायला  जात असताना मी मागून गाणे गुणगुणायला सुरुवात केली. तिने  माझ्याकडे वळून पाहिले आणि ती माझ्या प्रेमात पडली.

मुलगी म्हणते “इश्‍क में उम्र नहीं देखी जाती”

जेव्हा शमाईलाला विचारलं की लिकायात हे तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, तरी तू त्यांच्या प्रेमात कशी काय पडली? तर त्यावर ती म्हणाली की, “इश्‍क में उम्र नहीं देखी जाती, बस हो जात हैं”   प्रेमात वय पाहत नसल्याचे स्पष्ट मत 19 वर्षीय शामाईलाने दिले आहे.

दुसरीकडे लियाकत अलीने सुद्धा प्रतिक्रिया देत म्हटले की, हृदय तरुण असायला हवे, वय हा फक्त आकडा आहे.  शमाइला सांगते की, घरच्यांनी सुरुवातीला या नात्यावर आक्षेप घेतला होता, पण तिने घरच्यांचे मन वाळविले.  घरच्यांचे म्हणणे होते की, तुम्ही दोघे तयार आहात तर आम्ही काय करू शकतो. थोडक्यात काय तर, “मियाँ बीवी राज़ी तो  क्या करेगा क़ाज़ी” ही म्हण या दोघांना लागू पडते. या जोडप्याने सांगितले की त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लग्न केले.

व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

वयाच्या अंतरामुळे चर्चेत आलेल्या या पाकिस्तानी जोडप्याची एका युट्युबरने मुलाखत घेतली आहे. नेटकरींनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. लियाकत यांना विचारले असता, वयात अंतर असलेल्या जोडप्याने लग्न करावे का? त्यावर ते म्हणाले की प्रेमाला आणि लग्नाला वयाचे बंधन नसते. दुसरीकडे, शमाईलाने सांगितले की, प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.

रोमँटिक होण्यासाठी वयाची अट नसते

लियाकत म्हणतो की, रोमँटिक होण्यासाठी वयाची अट नसते. प्रत्येक वयाचा स्वतःचा वेगळा प्रणय असतो. लियाकत म्हणाले की, त्याने आयुष्यभर आनंद लुटला आहे. शमाईला म्हणते की ती लियाकतसोबत खूप खूश आहे.

जोडप्याने एकमेकांसाठी गायले गाणे

मुलाखतीदरम्यान लियाकतने शमाईलासाठी ‘जानू सुन जरा, आंखे तो मिला…’ हे गाणेही गायले. शमाईलाने लियाकतसाठी ‘मोहब्बत बरसा देना तुम, सावन आया है’ हे गाणे गायले.

वर दिलेल्या लव्ह स्टोरीची भाषा देखील बॉलिवूड फिल्म स्टोरी सारखीच आहे. बॉलिवूड मधून जसा छुपा फिल्म लव्ह जिहाद पसरवला जातो, तशा स्वरूपाची ही स्टोरी मराठी माध्यमांनी आफताब आणि श्रद्धा यांच्या लव्ह जिहाद स्टोरीचे टायमिंग साधून दिली आहे. यातून मराठी माध्यमांची मनोवृत्ती लक्षात येते.

Victim card of Marathi media as outrage over Aftab – Shraddha Love Jihad erupted

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात