वृत्तसंस्था
मुंबई : जग पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी, तिसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.A few things before getting the corona vaccine Should be avoided; Expert warning
या दरम्यान लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. मात्र, लस घेण्यापूर्वीचे 24 तास महत्वाचे आहेत. काही गोष्टींचे आवर्जून पालन करा, असे आवाहन तज्ञांनी केले.
पेन किलर घेऊ नका :
तुम्हाला कोरोनाची लस घ्यायची असल्यास तत्पूर्वी 24 तासआधी पेन किलर घेऊ नका. या मुळे लसीची प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता कमी होऊ शकते, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
दारू पिऊ नका :
लस घेण्याआधी दारू पिऊ नका. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन आणि हँगओव्हर होऊ शकतो. यामुळे लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो.
जागरण करू नका :
लस घेण्याआधी रात्री जागरण करू नका. चांगली आणि पुरेशी झोप घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर लसीला उत्तम प्रतिसाद देते तसेच लस घेतल्यानंतर आराम करणे आवश्यक आहे.
अन्य आजारांवरील लस घेऊ नका :
कोरोना विषाणूवरील लस घेण्यापूर्वी एक आठवडा अन्य आजारांवरील कोणतीही लस घेऊ नका. जर तुम्ही अशी कोणती लस घेतली असेल तर अशी लस घेतल्यापासून 14 दिवसांनी कोरोनाची लस घ्या.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App