नीलम गोऱ्हेंच्या नेतृत्वात विधीमंडळाचे शिष्टमंडळ अभ्यासदौऱ्यावर; ॲमस्टरडॅममध्ये जाणून घेतली विविध क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती


उभय देशांमध्ये व्यापार-उद्योगवृध्दीच्या विपुल संधी असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

विशेष प्रतिनिधी

ॲमस्टरडॅम : दुग्धउत्पादन, कृषीप्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञान यात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने परस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने नवी भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा अशी शुभकामना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. A delegation of the Maharashtra Legislature learned about modern technology in various fields in Amsterdam during a study tour

महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, लंडन (यु.के.) या तीन देशांच्या अभ्यासदौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व डॉ.नीलम गोऱ्हे या करीत आहेत. काल दिनांक 28 रोजी ॲमस्टरडॅम येथे भारताच्या राजदूत  रिनत संधू तसेच तेथील कृषी मंत्रालयातील अधिकारी फ्रेरडिक वोसेनोव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या अभ्यासभेटीत आधुनिक कृषीप्रक्रिया तंत्रज्ञान, आरोग्य, प्रदूषणनियंत्रण, जलव्यवस्थापन, पूरनियंत्रण, नैसिर्गिक जलस्त्रोत संवर्धन, शिक्षण, दुग्धप्रक्रिया  या क्षेत्रांशी संबंधित विषयांवर शिष्टमंडळ सदस्यांनी माहिती जाणून घेतली.

ॲमस्टरडॅम येथील स्थानिक स्वशासन संस्थेतील सदस्या प्राची कुलकर्णी यांनी तेथील स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील राज्यव्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रा.डॉ.मनिषा कायंदे, अभिजीत वंजारी, मनिषा चौधरी, सीमा हिरे, प्रज्ञा सातव, मनोहर चंद्रिकापुरे यांनी सहभाग घेतला. शिष्टमंडळाच्या नेत्या  नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते भारताच्या राजदूत संधू तसेच  सर्व मान्यवरांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या खूर आणि लाळ रोगांवरील लसनिर्मिती संदर्भात वडील डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांचे योगदान, नेदरलँड्सने त्यावेळी घेतलेला पुढाकार या आठवणींना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उजाळा दिला. दुग्धउत्पादन व तंत्रज्ञान यात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने परस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा अशी शुभकामना त्यांनी या वेळी व्यक्त केली. यावेळी नेदरलँड्स येथील मराठी मंडळाचे शिवम जोशी, अमेय धायगुडे,वैशाली नार्वेकर, ऋतुजा केळकर यांनी मराठी भाषा आणि  संस्कृती याच्या संवर्धनासाठी येथे आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

A delegation of the Maharashtra Legislature learned about modern technology in various fields in Amsterdam during a study tour

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!