”मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला आहे”, फोनवर माहिती मिळाताच उडाली खळबळ


ऑगस्ट महिन्यात विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात  बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारत आणि कॅनडातील सातत्याने बिघडत चाललेल्या राजकीय संबंधांमुळे खलिस्तानी संघटनांबाबत गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  बॉम्ब असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली असून, तातडीने तपास यंत्रणा अलर्ट झाल्या. A bomb has been placed at the Mumbai airport there was terror as soon as the information was received on the phone

तर, फोनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक न सापडल्याने मुंबई पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकारामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार रविवारी विमानतळावर निळ्या पिशवीत बॉम्ब असल्याचे सांगून बनावट कॉल करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई पोलीस अधिकारी आणि बॉम्बशोधक पथकाने विमानतळावर पोहोचून तातडीने तपास सुरू केला.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर तपासात काहीही आढळले नाही. सध्या पोलीस फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. यासोबतच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दिल्लीतील पालम येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशत निर्माण झाली होती.

A bomb has been placed at the Mumbai airport there was terror as soon as the information was received on the phone

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात