विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत उतरलेल्या ९६ परदेशी प्रवाशांपैकी तपासणीत एक प्रवासी कोरोना बाधित आढळल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली. 96 passengers from abroad arrive at Chippewa Airport; one migrant positive
पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले दोनजण कोरोना पॉझिटिव्ह; ओमायक्रॉनाचा धोका वाढला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर परदेशी पर्यटक उतरू लागले असून ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत चिपी विमानतळावर एकूण ९६ परदेशी प्रवासी उतरले. त्यापैकी ७ दिवस पूर्ण झालेल्या २५ प्रवाशांची आरटीपीसी आर तपासणी करण्यात येत आहे.
८ डिसेंबर पासून जिल्ह्यातील चिपी विमानतळावर उतरलेल्या ९६ प्रवाशांमध्ये वैभववाडी २, कणकवली ८, देवगड १५, मालवण ५, कुडाळ १०, वेंगुर्ला १५ सावंतवाडी ३६,तर दोडामार्ग ५,असे एकूण ९६ प्रवासी दाखल झाले. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील १ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App