वृत्तसंस्था
सातारा: सातारा जिल्ह्यातील पाटण येथे अल्पवयीन मुलीवर तब्बल आठ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे या प्रकाराला एका महिलाच जबाबदार असल्याचे उघड झाले आहे.9 accused arrested including one woman in satara district
आरोपींनी पीडितेला विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला आहे.एक महिलाच या पीडितेला नराधमांच्या हवाली करत होती.पीडित मुलीच्या आईनं पाटण ठाण्यात धाव घेतली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी १२ तासात एका महिलेसह ९ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मुलगी ही मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. तिच्या मतिमंदपणाचा गावातीलच एका महिलेनं फायदा घेतला आहे. आरोपी महिला अल्पवयीन मुलीला बाहेर फिरायला जाण्याचं, खाऊ-पिऊ घालण्याचं तसेच पैसे देण्याचं आमिष दाखवून तिला बाहेर घेऊन जात होती.
बाहेर गेल्यानंतर आरोपी महिला पीडितेची पाटण आणि आसपासच्या परिसरातील विविध लोकांची ओळख करून देत होती. तसेच संबंधित आरोपींशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत असे.आठ जणांनी या अल्पवयीन आणि मतिमंद मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात बलात्कार केला आहे.
हा धक्कादायक प्रकार २७ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान सुरू होता. पीडित मुलीच्या आईला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी लैंगिक अत्याचार व बालकांचं संरक्षण अधिनियमच्या कलम ४ , ५, १७ अन्वये गुन्हा दाखल केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App