Covid Care Center in Buldana : येथे कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतागृहात आठ वर्षांच्या बालकाला सफाई करायला लावण्याची घटना समोर आली आहे. मुलाने टॉयलेट साफ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला हे काम करायला लावणाऱ्या ग्रामपंचायत समिती सदस्याला निलंबित करण्यात आले आहे. 8 Year Old Child Cleaned Toilet Of Covid Care Center in Buldana, Video Viral
विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : येथे कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतागृहात आठ वर्षांच्या बालकाला सफाई करायला लावण्याची घटना समोर आली आहे. मुलाने टॉयलेट साफ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला हे काम करायला लावणाऱ्या ग्रामपंचायत समिती सदस्याला निलंबित करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान बालक शौचालय स्वच्छ करताना दिसत आहे. यासाठी एक माणूस त्याला सूचना देतानाही दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून व्हायरल होणारा हा व्हिडिओ बुलडाणा जिल्ह्यातील मरोर गावचा आहे. हा व्हिडिओ गावातील जिल्हा परिषद शाळेचा आहे, प्रशासनाने सध्या येथे विलगीकरण केंद्र उभारले आहे.
सध्या या केंद्रावर कोरोना रुग्णही आहेत. जिल्हा समितीला कळले की, जिल्हा अधिकारी येथे तपासणीसाठी येणार आहेत. अशा परिस्थितीत कोणीही स्वच्छतागृह स्वच्छ करण्यास तयार नव्हते. पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याने आठ वर्षांच्या मुलाला शौचालय स्वच्छ करायला लावले.
कोरोना रुग्णांची स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी कोणी मिळाले नाही म्हणून त्या लहान बालकाला ते स्वच्छ करायला लावण्यात आले. मुलाने सांगितले की, शौचालय स्वच्छ करण्यासाठी त्याला लाकडाने मारहाण करण्याची धमकी दिली होती. शौचालय स्वच्छ केल्यानंतर त्याला पन्नास रुपयेही देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये मुलाला सूचना देणार्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
8 Year Old Child Cleaned Toilet Of Covid Care Center in Buldana, Video Viral
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App