मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत

eknath shinde and devendra fadanvis

वृत्तसंस्था

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (29 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा ठेवून मदत करण्याचाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एनडीआरएफच्या नियमानुसार ही मदत दिली जाणार आहे.8 important decisions were taken in the cabinet meeting; Immediate assistance will be given to farmers affected by bad weather



औरंगाबाद, जळगाव, नाशिकमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; अवकाळीने शेतकरी धास्तावले

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्तपणे

1. अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार ( मदत व पुनर्वसन)
2. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा ( गृहनिर्माण विभाग )
3. राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा ( शालेय शिक्षण)
4. मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार ( मराठी भाषा विभाग)
5. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली ( अल्पसंख्याक विभाग )
6. औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन ( उद्योग विभाग )
7. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार ( महसूल विभाग)
8. शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा ( महसूल विभाग)

8 important decisions were taken in the cabinet meeting; Immediate assistance will be given to farmers affected by bad weather

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात