ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस; एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा आरोप

वृत्तसंस्था

मुंबई : जीएसटी गुप्तचर विभागाने 55 हजार कोटी कर थकबाकीबद्दल 12 कॅसिनो आणि 12 ऑनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये ड्रीम इलेव्हन, गेम्स प्ले, ट्वेंटीफोर सेव्हन, हेड डिजिटल वर्क्स या कंपन्यांचाही समावेश आहे.55 thousand crore tax notice to online gaming companies; Allegation of failure to pay GST on gross income



गेमिंगच्या एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा या कंपन्यांवर आरोप आहे. गेमिंग युनिकॉर्न कंपनी ड्रीम इलेव्हनने 25 हजार कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. अप्रत्यक्ष कर भरणा थकवल्याप्रकरणी बजावण्यात आलेली देशातील ही सर्वात मोठी कर नोटीस आहे. या उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते आगामी काळात गेमिंग कंपन्यांना 1 लाख कोटी रुपयांपर्यंत नोटीस दिली जाऊ शकते.

ड्रीम इलेव्हन हायकोर्टात

नोटीस मिळाल्यानंतर ड्रीम इलेव्हन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये बंगळुरूची ऑनलाइन गेमिंग कंपनी गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीला 21 हजार कोटींची कर नोटीस बजावण्यात आली होती. अप्रत्यक्ष कर प्रकरणाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड रकमेची कर नोटीस पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

55 thousand crore tax notice to online gaming companies; Allegation of failure to pay GST on gross income

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात