विशेष प्रतिनिधी
शिर्डी : गेली 53 वर्षे निळवंडे च्या कामाचे नुसते नारळ फोडले पण प्रत्यक्ष उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावे लागले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच आपणच सामील असलेल्या जुन्या सरकारांचे वाभाडे काढले. गेल्या 53 वर्षांपैकी 20 वर्षे अजितदादा कुठल्या ना कुठल्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यातही अनेक वर्ष त्यांच्याकडे जलसंपदा खाते होते. 53 years of Nilavande’s work just broke the coconut says ajit pawar
पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर बोलताना अजितदादा म्हणाले, “माझं आजोळ नगर जिल्हा असल्यामुळे मला चांगलं आठवतंय. गेल्या 53 वर्षांत कितीतरी वेळा निळवंडे धरणाच्या कामाचा नारळ फोडण्याचे काम अनेक राज्यकर्त्यांनी केले. निवडणुका आल्या की नारळ फोडायचा आणि सांगायचं आता आम्ही निळवंडे धरणाचे काम करणार, पण बघता बघता तीन पिढ्या गेल्या आणि अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कालव्याचे लोकार्पण होत आहे.”
नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे लोकार्पण आणि इतर विकासकामांचे उद॒घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात अजित पवार यांनी निळवंडे धरणाच्या कामाच्या विलंबाबत काँग्रेसच्या सरकारांना जबाबदार धरले. साधारण 20 वर्षे ते त्याच मंत्रिमंडळांमध्ये मंत्री होते.
महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या भेटीतून लोककल्याणची ऊर्जा मिळो, अशी प्रार्थना मी करतो. साईबाबांनी सबका मालिक एक असा मंत्र दिला. याचा अर्थ असा की सर्व जगाचे कल्याण करणार ईश्वर एकच आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा करून त्यांच्या प्रशासनचा मंत्र त्या घोषणेमार्फत लोकांपुढे ठेवला होता. त्या घोषणेची प्रेरणा साईबाबांच्या ‘सबका मालिक एक’ या मंत्राचीच असावी. गेली साडेनऊ ते दहा वर्षे त्यांची कारकीर्द पाहिली, तर ते या घोषणेच्या मार्गानेच ते देशाला पुढे नेत असल्याचे आपल्याला सर्वांना पावलोपावली जाणवतं, असेही अजित पवार यांनी सांगितले.
निळवंडे धरणाबाबत पवार यांनी सांगितले की, निळवंडे हे साडेआठ टीएमसीचे धरण असून, पावणदोन लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पाणी काटकसरीने वापरले, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला तरच सर्वांना पाणी मिळणार आहे. जवळपास 182 गावांना या धरणाचे पाणी मिळणार आहे. अनेक चढउतार आपण बघितले. दुसरा कॅनॉलही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. हे धरण पूर्णत्वास नेण्याचे आणि त्याचे उद्घाटन करण्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायचं होतं. त्यामुळे मधला एवढा काळ गेला असावा.
रेल्वेची सुविधा, पाणी, भक्तांसाठी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केंद्रीय पातळीवर चालला आहे. एक रुपयांत पीकविमा यांसारखे अनेक निर्णय घेतले आहे. प्रत्येक व्यक्तीला हे सरकार माझाही विचार करत आहे, असे वाटलं पाहिजे, असंही अजित पवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App