मनोज जरांगेंच्या सरकारपुढे 5 अटीशर्ती; उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उदयनराजे – संभाजीराजेही हवेत उपोषणस्थळी!!

प्रतिनिधी

जालना : मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू असताना त्यांनी पाच अटी शर्तीवर उपोषण सोडण्याची तयारी दाखवली आहे. मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा अवधी दिला. पण याचवेळी त्यांनी सरकारपुढे 5 अटीही ठेवल्या. उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उदयनराजे – संभाजी राजे सर्वजण उपोषण स्थळावर हवेत अशा त्या अटी आहेत या अटींमध्ये शरद पवारांचे नाव कुठेही नाही. 5 conditions before Manoj Jarang’s government

महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार अस्तित्वात असताना मनोज जरांगे यांनी सुमारे एक महिन्याचे उपोषण केले होते. त्यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटलांशी यशस्वी चर्चा करून उपोषण सोडविले होते, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकारला मात्र उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीची अट घातली आहे.

मनोज जरांगे यांच्या 5 अटी

मराठा आरक्षणासंबंधी सरकारने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल कसाही येवो मराठ्यांना 31 व्या दिवशी कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झाले पाहिजे. हे आज लेखी द्यायचे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रकरणी महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले, ते सर्व मागे घेतले पाहिजेत.

लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे.

उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांनी आंतरवाली सराटीत उपस्थित राहावेत. सरकार आणि मराठा समाजाच्या मध्यभागी दोन्ही राजांनी उपस्थित रहावे.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हे सर्वकाही लेखी लिहून द्यावे.

…तर 12 ऑक्टोबर रोजी 100 एकरांत विराट सभा

सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आजपासून 30 दिवसांनी म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी 100 एकरांत विराट सभा घेतली जाईल. या सभेला महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी यायचे. सभा अशी विराट घ्यायची की मराठ्यांचे नाव घेतले तरी सरकारचा थरकाप उडाला पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.

माझ्या लेकरांचे मी तोंड पाहणार नाही

मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. ही जागा सोडणार नाही. माझ्या लेकरांचे मी तोंड पाहणार नाही. घराचा उंबरठा ओलांडणार नाही. यापुढे पुढील महिनाभर आमरण उपोषणाचे रुपांतर साखळी उपोषणात करा, असेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपल्याला आंदोलनाची प्रतिष्ठा घालवायची नाही. दिल्लीत शेतकऱ्यांनी तब्बल 8 महिने आंदोलन केले होते. आता आपण सरकारला 1 महिना देऊ, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

5 conditions before Manoj Jarang’s government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात