तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची ‘ईडी’कडून चौकशी

 करोडोंच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँ यांची फ्लॅटच्या विक्रीत कोट्यवधी रुपयांची सुमारे ५०० लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. Trinamool Congress MP Nusrat Jahan interrogated by ED

नुसरत जहाँवर फ्लॅटच्या विक्रीसाठी लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. मात्र पैसे घेऊनही त्यांनी सदनिका खरेदीदारांना दिली नाही. त्यानंतर भाजपा नेते शंकुदेव पांडा यांनी ईडीमध्ये तक्रार दाखल केली होती.

फ्लॅट देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नुसरत जहाँ मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सॉल्ट लेकमधील सीजीओ कॉम्प्लेक्सच्या ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. तेथे त्यांची  चौकशी सुरू करण्यात आली. ईडीमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत नुसरत जहाँवर 2 खोल्यांचा फ्लॅट देण्याच्या नावाखाली 500 लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे, मात्र  खासदार नुसरत जहाँ यांनी फसवणुकीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Trinamool Congress MP Nusrat Jahan interrogated by ED

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात