विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ४० लाखाची विदेशी दारु जप्त केली. मद्य वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात झाल्याचा बनाव रचून ठोक विक्रेता आणि वाहन चालकाने संगनमत करत ही दारू विक्री केली होती. 40 lakh worth of foreign liquor confiscated, to sell by making an accident; action taken by State Excise Department
करमाळा तालुक्यातील जातेगावजवळ अपघात झाल्याचा बनाव रचून नगर जिल्ह्यातील दारु विक्रेत्याला ही विदेशी दारु विकण्यात आली होती. कंटेनरमधील १ हजार दारु बॉक्सपैकी ५९५ विदेशी मद्याच्या पेट्या विक्री करुन रस्त्यावरून कंटेनर पलटी झाल्याचा रचला बनाव वाहन चालक आणि ठोक विक्रेत्याने केला होता. ज्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळी भेट देऊन वाहनचालकाची चौकशी केली. त्यावेळी काहीतरी गौडबंगाल असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तेव्हा आरोपी वाहनचालक जहिर अत्तर याची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
याप्रकरणी आरोपी वाहनचालक जहीर अत्तार आणि विष्णू डमाळे यांना अटक केली तर कंटेनरमालक गुलाम अन्सारी आणि खरेदीदार दामू जाधव हे दोघे अद्याप फरार आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापूर अधिक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App