विशेष प्रतिनिधी
जालना : Jalna झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना जालना ( Jalna ) शहरात रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले. पीडित बालिका इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आहे. घटनेनंतर दीड तास पीडितेच्या शररीरातून रक्त वाहत होते, तसेच 13 तास ती बेशुद्ध होती. याप्रकरणी परिसरातच राहणारा 19 वर्षीय आदित्य सुभाष जाधव या नराधमास अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी व आई घरात दोघीच होत्या. बांधकाम कामगाराचे किट आणण्यासाठी रात्रीच्या वेळी मुलीची आई शेजारी गेली होती. या वेळेतच एक जण घरात घुसला. त्याने झोपेत असलेल्या मुलीच्या तोंडावर शाल टाकून उचलून नेले. नंतर तिच्यावर अत्याचार केला.Jalna
या वेळेत आई किट घेऊन घरी आली. परंतु, मुलगी घरातून बेपत्ता झाल्याने त्यांनी बाहेर शोधाशोध केली. मुलगी न सापडल्याने महिलेने परिसरातच राहणाऱ्या भावाला याची माहिती दिली. यानंतर काही वेळाने नातेवाइकांनी येऊन मुलीचा शोध घेतला. परंतु, मुलगी न सापडल्यामुळे त्यांनी पोलिस ठाणे गाठले. नंतर घराच्या परिसरातच मुलगी सापडल्याची माहिती त्यांना मिळाली.
यामुळे चंदनझिरा ठाण्याचे पोलिसांनी पीडितेचे घर गाठले. त्या वेळी मुलगी बेशुद्ध होती. तिला महिला व बाल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अत्याचाराचा प्रकार समोर आला. त्यानंतर मुलीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी पाहणी केली आहे.
पीडितेने सांगितले वर्णन
दाढी वाढलेल्या उंच माणसाने उचलून नेले, असे वर्णन पीडित बालिकेने घाबरत आणि हुंदके देत पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या आईचाही जबाब नोंदवला पीडितेच्या आईसोबत पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी चर्चा केली. घटना कशी घडली, तुम्ही किती वेळात परत आलात, किती वेळ शोध घेतला यासह अन्य बाबी त्यांनी जाणून घेतल्या.
रास्ता रोकोमध्ये मुजोर आरोपीचाही सहभाग
सोमवारी दुपारी या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी जालना-संभाजीनगर मार्गावर तासभर रास्ता रोको केला. आरोपींना आमच्या ताब्यात द्या, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. जालन्यातील चंदनझिरा परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे आरोपी आदित्य जाधव हा रास्ता रोकोत सहभागी झाला होता. आरोपीला कधी पकडणार, असेही तो पोलिसांना विचारत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघून उचलले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App