प्रतिनिधी
सातारा : प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी ऐतिहासिक काळातले आहेत की ते अतिक्रमण आहे?, या कबरी नेमक्या कोणाच्या आहेत? हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 3 more graves found near afzal khan grave at pratap gad
मात्र अफजलखानाच्या कबड्डी शेजारी आणखी तीन कबरी असल्याच्या बातमीला साता-याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. सध्या या कबरी नक्की कोणाच्या याबाबत माहिती काढण्याचे काम महसूल विभागाचे अधिकारी करीत आहेत.
शिवप्रतापदिनी अफजल खानाच्या कबरीजवळच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; परिसरात कलम 144 लागू
प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम महसूल विभाग आणि वनविभागाने बुलडोझर लावून पाडले. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधून ही कारवाई केली.
2006 सालापासून हा परिसर सील
हिंदुत्ववादी संघटनांनी अफझल खानाच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली होती. तसेच, शिवप्रेमींकडून वारंवार मागणी होत असल्याने, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App