संभाजीनगरात गॅस टँकर दुर्घटनेचा 12 तास थरार, अथक प्रयत्नांनंतर हवेत विरला गॅस, अखेर टळले महाप्रचंड स्फोटाचे संकट

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : तब्बल 18 हजार किलो एलपीजी गॅसची वाहतूक करणारा एचपी कंपनीचा टँकर गुरुवारी पहाटे 5.15 वाजता सिडको उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. त्यामुळे प्रचंड गॅसगळती सुरू झाली. काही मिनिटांत अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन टँकरवर पाणी मारून स्फोट होणार नाही याची काळजी घेतली. दुसरीकडे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सिडको चौकाच्या एक किमी परिघातील शेकडो घरे, इमारती रिकाम्या केल्या.12 hours of thrill of gas tanker accident in Sambhajinagar, after tireless efforts, gas was dispersed in the air, the danger of massive explosion was finally averted

सकाळी शाळेत आलेली मुलेही घरी पाठवण्यात आली. रस्ते बंद करण्यात आले. सोशल मीडियाद्वारे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. पहाटे 5.30 वाजता सुरू झालेले बचावकार्य सायंकाळी 5.45 वाजता संपले अन‌् मोठ्या संकटातून शहर बचावले.



घरात गॅस, दिवाही न पेटवण्याच्या सूचना

सिडकोत येणारी व जाणारी वाहतूक सकाळी 6 वाजेपासून वळवण्यात आली होती. सकाळी 11 वाजेपासून 1 किलोमीटर परिघात जमावबंदी लागू करण्यात आली होती. दीड लाख लोकांना स्थलांतराच्या सूचना कॉलनी-कॉलनीत भोंगा फिरवून व सोशल मीडियावर देण्यात आल्या. घरात गॅस, साधा दिवा-उदबत्तीही न पेटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. नऊ रुग्णवाहिका, शासकीय व खासगी रुग्णालयातील 350 बेड, डॉक्टरांची टीम सज्ज ठेवण्यात आली होती. घटनास्थळ हायकोर्टाजवळ असल्याने दिवसभराचे कामकाज रद्द करण्यात आले होते.

एचपी कंपनीच्या सल्ल्याने पथकाने वॉटर कर्टनचा वापर करून ज्वलनशीलता कमी केली. पहाटेची वेळ असल्याने तापमान कमी होते. गारवा होता त्यामुळेही स्फोट झाला नाही, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकारी प्रकाश मुंडे यांनी दिली.

1.5 लाख लोकांची सिडको वसाहत या प्रयत्नांमुळे सुखरूप राहिली. 250 हॉटेल्स, 700 दुकाने दिवसभर बंद राहिली. तब्बल 6 लाख लिटर पाण्याचा मारा करण्यात आला. टँकरच्या 102 फेऱ्या झाल्या. या काळात 12 तास वीजपुरवठा बंद होता. सायंकाळी 6.50 नंतर पूर्ववत करण्यात आला.

एलपीजीची गळती सुरू झाल्यानंतर गॅस जमिनीवर जमा होतो. या जमा झालेल्या गॅसचा एखाद्या ठिणगीनेही मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे गळती सुरू असलेल्या ठिकाणी एकसारखा पाण्याचा मारा करून गॅस विरघळत ठेवावा लागतो. एकदा पाण्याशी संपर्क आल्यावर गॅस विरतो आणि त्याची ज्वलनशक्तीदेखील कमी होते. अशा घटनेमध्ये जोपर्यंत गळती सुरू आहे तोपर्यंत नियमित पाणी मारणे हाच स्फोटापासून वाचण्याचा सर्वोत्तम पर्याय असतो.

12 hours of thrill of gas tanker accident in Sambhajinagar, after tireless efforts, gas was dispersed in the air, the danger of massive explosion was finally averted

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात