विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमदार प्रसाद लाड यांनी स्वत:च चक्क विधान परिषदेत आपली प्रेमकहाणी सांगितली. आमदाराच्या मुलीवर प्रेम असल्याने चक्क पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले. त्यासाठी अगदी हमालीही केल्याचे त्यांनी सांगितले.MLA Prasad Lad’s love affair, MLA’s daughter was kidnapped and married
विधान परिषदेत समारोपाच्या भाषणात बोलताना लाड यांनी वयाच्या १९व्या वर्षी आपण आमदारच्या मुलीला पळवून नेत प्रेमविवाह केला होता, असा खुलासा केला. ते म्हणाले, लग्नासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण असल्याची अट होती. मी १९व्या वर्षी लग्न केलं आणि २१ व्या वर्षी मुलगी झाली.
जयंत पाटलांमुळे सिद्धीविनायक न्यासाचा मी ३१ व्या वर्षी विश्वस्त झालो. तेव्हा शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ हे तिथे विश्वस्त होते. वडील १९६८ मध्ये शिवसैनिक होते. परळमध्ये छोट्याशा खोलीत राहायचो. कॉलेजमध्ये शिकता शिकता प्रेमप्रकरण सुरू झालं.
माज्या पत्नीचे वडील बाबुराव भापसे विधानपरिषद सदस्य होते. दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेचे आमदार राहिले. त्यावेळी त्यांचा मुंबईमधला रुबाब जेव्हा पाहायचो, त्यावेळीच ठरवलेलं की आयुष्यात एकदा तरी आमदार व्हायचे. त्याकाळी बाबुराव भापसे यांची मुलगी मुंबईतून पळवून नेऊन लग्न करणं ही खुप मोठी गोष्ट होती.
खिशात पैसे नव्हते. मग मी मेहनत करायला सुरुवात केली. टाईम्स ऑफ इंडियात मी हमाली करायचो. त्याचे ७० रुपये मला मिळायचे. त्यापैकी ४० रुपये बायकोला द्यायचो आणि ३० रुपयांनी विद्यार्थी काळातलं राजकारण करायचो. अशाप्रकारे संघषार्तून सगळं मिळवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App