समर्पण – राजधर्म : गावात छोटंसं चहाचं दुकान चालवणार्या सीएम योगींच्या मोठ्या भगिनीची योगिंना भावूक साद – एकदा तरी घरी येऊन आईला भेटून जा ….


के घर कब आओगे…..??

योगी नोकरीच्या बहाण्याने घरातूनच बाहेर पडले अन् महात्मा झाले …ही गोष्ट त्यांच्या कुटुंबाला माहित नव्हती …रडतच योगिंच्या मोठ्या भगिनी शशी सांगत होत्या … पूर्वी कुठीही साधू संत दिसले की त्या आपल्या भावाला शोधत होत्या ….Dedication: An emotional call of the elder sister of CM Yogi, who runs a small tea shop in the village – Come home and visit your mother at least once ….


विशेष प्रतिनिधी

लखनऊ:वयाच्या १८ व्या वर्षी घर सोडून गेलेले महंत योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची कमान सांभाळणार आहेत. सीएम योगी यांच्या शपथविधीच्या तयारीत असताना त्यांच्या मोठ्या बहिणीने भावनिक आवाहन केले आहे. योगी यांच्या मोठ्या बहीण शशी सिंह म्हणाल्या एकदा तरी घरी येऊन आईला भेटून जा. Dedication: An emotional call of the elder sister of CM Yogi, who runs a small tea shop in the village – Come home and visit your mother at least once ….

योगी घरातून बाहेर पडले तेव्हाची वेळही शशी यांना आठवते. अलीकडेच  टीव्ही चॅनलवर त्यांच्या बहिणीचा चहा विकतानाचा फोटो दाखवल्यावर योगी म्हणाले होते की, यूपीचे लोक हेच त्यांचे कुटुंब आहे.त्यावेळी योगींचे डोळे पाणावले होते .

उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात जन्मलेल्या अजय सिंह बिश्त यांनी वयाच्या १८ व्या वर्षी घर सोडले. गोरखपूरच्या मठातच त्यांना आदित्यनाथ हे नाव मिळाले. योगी यांची बहीण शशी सिंह यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, योगी जेव्हा घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी आपण संन्यासी होणार असल्याचे सांगितले नव्हते.

उत्तराखंडमधील आपल्या गावात चहाचे छोटेसे दुकान चालवणाऱ्या शशी सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने चहाची टपरी चालवावी यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबाला घराणेशाही आवडत नाही. इतर पक्षांमध्ये घराणेशाहीने सर्व सदस्य राजकारणात येतात.हे आमच्या कुटुंबात नाही… त्यामुळे कुटुंबवाद बनतो हे आम्हाला हे नको आहे आणि योगी देखील तेच म्हणतो – स्वतः कमवा आणि खा…

जेव्हा शशीला विचारण्यात आले की त्यांना भावाला काय संदेश द्यायचा आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की एकदा आईला भेटायला ये .

 योगींनी आपल्या वडिलांना केवळ कुटुंबाचाच नव्हे तर इतरांचाही विचार करण्यास सांगितले होते ते  देखील शशी यांना आठवले. उत्तरात वडिलांनी सांगितले की, ते फक्त 85 रुपये कमावतात त्यात इतरांचा विचार करणे शक्य नाही. तू काय करतो ते पाहू या… आणि आता त्यांनी ते केले आहे …

Dedication: An emotional call of the elder sister of CM Yogi, who runs a small tea shop in the village – Come home and visit your mother at least once ….

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात