विशेष प्रतिनिधी
लंडन :ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस विकसित करण्याऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या विषाणूतज्ज्ञ डेम सारा गिलबर्ट यांना विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एका सामन्यात स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवून मानवंदना दिली. सध्या सोशल मिडीयामध्ये हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.Wimbledon court felicitate scientist
खेळाडूंच्या या पंढरीत शास्त्रज्ञाला मिळालेली मानवंदना जगभऱ चर्चेचा विषय बनली आहे.विंबल्डन स्पर्धेच्या आयोजकांनी यंदा राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि कोरोना विषाणू प्रतिबंधक लशीच्या निर्मात्यांना ‘व्हीआयपी रॉयल बॉक्स’मध्ये बसून सामने पाहण्यासाठी निमंत्रित केले होते
. यामुळे सारा गिलबर्टही सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. नोव्हाक जोकोविच सर्व्हिस करीत असतानाच ‘ सध्याच्या अत्यंत कठीण काळात ज्यांनी आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो,’’
अशी घोषणा कोर्टात खेळाडूंचे स्वागत करण्यापूर्वी झाली. टेनिसप्रेमींनीही उभे राहून व टाळ्या वाजवून सारा यांना मानवंदना दिली. साधारण एक मिनीट उभे राहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App