सुलतानशाही ममतांची की मोदींची?? महाराष्ट्रही दिल्लीपुढे झुकणार नाही… पण कोणता…??


सामनाकारांच्या लेखणीच्या तलवारीवरचे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाणी उतरून सिल्वर ओकच्या नळाचे पाणी तलवारीवर चढले की असेच दिसायचे…!!


विनायक ढेरे

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा दिल्लीवर आपल्या सामनात लेखणीची तलवार चालविली आहे. पूर्वी तलवारीने कडबा कापणाऱ्यांना अडाणी म्हटले जायचे. आता वाढदिवसांचे केक तलवारीने कापणारे वीर महाराष्ट्रातल्या गल्लोगल्ली आणि गावोगावी आढळतात. sanjay raut dumps hindutva and praise mamata bano in bengal

राऊतांची सामनातली ही तलवारबाजी त्याच कॅटॅगेरीतली आहे. राऊतांच्या हाती लेखणीची तलवार जरूर आहे पण ती त्यांची स्वतःची नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे ती तलवार तेज आहे आणि त्यावर हिंदुत्वाचे पाणी दिलेले होते. पण राऊतांनी त्या तलवारीवरचे हिंदुत्वाचे पाणी काढून टाकून ती चालवलेली दिसत आहे. अन्यथा त्या लेखणीच्या तलवारीने ममता बॅनर्जींची भलामण त्यांनी केली नसती आणि केंद्रातल्या १०० नंबरी हिंदुत्ववादी मोदी सरकारला त्यांनी दिल्लीची सुलतानशाही असे म्हटले नसते.

आणि खरेच हो… राऊत साहेब, सुलतानशाही सुरूच आहे, पण दिल्लीतली नसून ती बंगालमध्ये ममतांची चालू आहे हे तिथल्या हिंदूंच्या शिरकाणावरून आणि हिंदू विस्थापित झाल्यावरून दिसते आहे. तृणमूळचे मुस्लीम गुंड महिलांवर अत्याचार करीत आहेत. हजारो हिंदूंना बेघर करीत आहेत आणि ममता बानो ते उघडपणे होऊ देत आहेत. पण राऊतांनी बाळासाहेबांनी दिलेल्या लेखणीच्या तलवारीवरचे हिंदुत्वाचे पाणी काढून टाकल्यामुळे त्यांना बंगालमध्ये ममता बीबीची सुलतानशाही दिसेनाशी झाली आहे आणि त्यांना मोदींची दिल्लीतली सुलतानशाही दिसते आहे.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाणी उतरवून सिल्वर ओकच्या नळातले पाणी लेखणीच्या तलवारीवर चढविले की एवढा फरक पडायचाच. नाही तरी बाळासाहेबांनी म्हटले होतेच… देशाभिमान या तरूणांच्या मनात भिनवायचा नाही, तर मग काय म्युनसिपालिटीच्या नळात भिनवायचा…!! तेच म्युनसिपालटीच्या नळातले पाणी सिल्वर ओकमध्ये पोहोचून ते राऊतांच्या लेखणीच्या तलवारीवर चढले आहे.

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही, असे राऊतांनी लिहिले आहे. ते खरेच आहे. पण राऊतांच्या लेखणीच्या तलवारीतून अर्धसत्य बाहेर आले आहे. होय. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाहीच. पण तो बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे. सिल्वर ओकचा आणि मातोश्री – २ चा महाराष्ट्र नाही. तो आचार्य अत्र्यांचा महाराष्ट्र आहे. चिंतामणराव देशमुखांचा महाराष्ट्र आहे, तो महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही…!!

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. हे जप गेली ६० वर्षे ऐकून कान किटले. प्रीतीसंगमावरील कराडकरांना नेतृत्व महाराष्ट्राने दिले. ते दिल्लीसमोर झुकले. बारामतीकरांना नेतृत्व दिले. ते दिल्लीसमोर झुकले. या दोघांनी मंत्रिपदे दिल्लीच्या कृपेने भोगली. हा कटू असला तरी इतिहास आहे…!!

… आणि खऱ्या अर्थाने झुकला नाही, असेच म्हणायचे असेल तर तो गुजरात झुकला नाही असेच म्हणावे लागेल. कारण मोरारजी आणि मोदी यांच्या रूपाने दोन पंतप्रधान गुजरातने देशाला दिले आहेत. हे सामनाकारांना दिसणार नाही. कारण त्यांच्या लेखणीच्या तलवारीचे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाणी कधीच उतरून गेले आहे. त्यावर सिल्वर ओकमधल्या नळाचे पाणी घट्ट चढून बसले आहे…!!

sanjay raut dumps hindutva and praise mamata bano in bengal

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण