विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: SARS-CoV-2 हा विषाणू कोरोना प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरला होता. भविष्यात अशा प्रकारच्या आणखी विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी २६ तज्ञांची समिती नेमली गेली आहे. ही समिती ‘वैज्ञानिक सल्लागार गट’ म्हणून काम करेल. रशियामधील एका तज्ञ डॉक्टरांनी अशी शक्यता वर्तवली आहे की हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग यांच्यामुळे बुबोनिक प्लेग परत येऊ शकतो. अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एक समिती नेमली गेली आहे.
WHO trying to find out new origins of Corona and other Viruses, Committee of 26 expert members appointed
कोरोना विषाणू हा शेवटचा नसून भविष्यात अशा अनेक रोगांची उत्पत्ती होऊ शकते. यासारख्या इतर विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला ही तज्ञ समिती मार्गदर्शन करणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातून आलेल्या ७०० अर्जांमधून या २६ तज्ञांची निवड केली आहे. “पुढील काळात कोणते विषाणू किती धोकादायक असू शकतात याचा अंदाज बांधणे व सुरक्षेची योजना करणे असा आमचा प्रयत्न असणार आहे.” असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले आहे.
WHO तज्ञांची बैठक पुढील महिन्यात , बूस्टर डोस किती महत्त्वाचा आहे हे सांगणार
या समितीकडून कोरोना विषाणूचा उगम नक्की कुठे झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र ही समिती चीनला जाणार की नाही हे स्पष्ट केलेले नाही. वटवाघुळांच्या मार्फत या कोरोनाचा उगम झाला असा समज आहे. पण या गोष्टीचा वैज्ञानिक पुरावा नाही. दीड वर्ष झाली पण अजूनही या विषाणूच्या उगमाबाबत नेमका निष्कर्ष निघालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App