विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी भारताला औषधे आणि वैद्यकीय उपकरणासह सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे आश्वाीसन दिले. USA assured India regarding help joe biden kamala harris
तत्पूर्वी अमेरिकी सरकारने भारताला मदत करण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेच्याच खासदारांनी टीका केली होती. अनेकांनी भारताला मदत करण्याचे आवाहन केले होते.
अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्विट करत म्हटले की, सुरवातीला कोविड संसर्ग सुरू झाल्यानंतर भारताने अमेरिकेला मदत केली होती. त्यावेळी अमेरिकेतील रुग्णालयावर औषधांसाठी दबाव वाढला होता. त्याचप्रमाणे आता भारताला मदत करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
त्याचवेळी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी देखील ट्विट करत म्हटले की, कोविडने थैमान घातले असून सध्याच्या चिंताजनक परिस्थितीत भारताला अतिरिक्त मदत आणि उपकरणे पाठविण्याबाबत अमेरिका काम करत आहे. मदत करण्याबरोबरच भारतातील फ्रंटलाइन वर्करच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवल्यानंतर बायडेन आणि हॅरिस यांनी प्रथमच ट्विट रुपातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App