विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशींबद्दल चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास सोशल मीडिया कंपन्यांना अपयश आले असून त्या लोकांच्या मारेकरी ठरत आहेत,’’ अशी कठोर टीका अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली US president attacks on social media
सबुकसारख्या सोशल मीडिया व्यासपीठांना काय संदेश द्याल, असे पत्रकारांनी विचारले असता बायडेन म्हणाले की, ते लोकांचा जीव घेत आहेत.
आमच्याकडे ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असेही ते म्हणाले.चुकीची माहिती प्रसारित करण्याच्या आरोपांचे खंडन करीत फेसबुक’चे प्रवक्ते म्हणाले की, तथ्यहिन आरोपांमुळे आम्ही विचलीत होणार नाही.
सत्य हे आहे की, फेसबुकवर दोन अब्ज लोकांनी कोरोनासंबंधी आणि लसीकरणाबद्दल अधिकृत माहिती पाहिली आहे. लस कोठे व कशी घ्यायची याची माहिती आमच्या व्यासपीठावरून ३३ लाख अमेरिकी नागरिकांनी घेतली. जीव वाचविण्यासाठी ‘फेसबुक’ सहाय्यक ठरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App