अफगणिस्थानला आपल्या नशीबावर सोडून गेलेली अमेरिका त्यांच्या नागरिकांसाठी पुन्हा सैन्य पाठविणार


विशेष प्रतिनिधी

काबूल : अमेरिकेतील ९/११ च्या हल्यानंतर अमेरिकेने अफगणिस्थानमध्ये सैन्य पाठविले. तालीबान सरकार बरखास्त केले. यामध्ये अफगणिस्थानातील अनेक घटकांनी अमेरिकेला मदत केली. मात्र, या सगळ्या अफगाणींना आपल्या नशीबावर सोडून अमेरिकेने सैन्य परत बोलावले. आता मात्र शहरामागून शहरे तालीबान काबीज करत चालल्याने अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अफगणिस्थानात पुन्हा सैन्य पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.The United States, which has left Afghanistan to its own destiny, will send troops back tosave American citizens

अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. देशातील ६० टक्के भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली आला आहे.या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका पुन्हा एकदा आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये पाठवणार आहे.



बायडन प्रशासनातील एका अधिकाऱ्याने यासंदभार्तील माहिती दिली आहे. तालिबानकडून एकेक करत अफगाणिस्तानधील मोठे भाग ताब्यात घेण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाºयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी थेट सैन्याला पाचारण करण्यात येणार आहे.

पेंटागनच्या जॉन किर्बी यांनी सांगितले की, काबुल येथील दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्रालय अमेरिकेचे सैन्य पाठवणार आहे. यामध्ये ३ हजार सैनिकांचा समावेश असेल. तसेच अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या नागरिकांना मायदेशात परतण्यास कोणतीही आडकाठी करण्यात आल्यास सैन्य तातडीने त्यावर अ‍ॅक्शन घेईल, असेही त्यांनी नमूद केले.

ब्रिटनही आपल्या नागरिकांना सहीसलामत अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी ६ हजार सैनिकांना पाठवणार आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानने शुक्रवारी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंदाहार ताब्यात घेतले. तालिबानने शुक्रवारी दावा केला की त्यांनी आणखी एक प्रांतीय राजधानी कंदाहार ताब्यात घेतले आहे. आता फक्त राजधानी काबूल शिल्लक आहे. काबुलनंतर कंदाहार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानची पकड हळूहळू मजबूत होत आहे. तालिबानचे पुढील लक्ष्य काबूल असेल. तालिबानने कंदाहारवर ताबा मिळवण्यापूर्वी आणखी दोन प्रांतीय राजधानी गझनी आणि हेरातवर ताबा मिळवला. तालिबान काबूलपासून अवघ्या १३० किमी अंतरावर आहेत. तालीबान्यांनी आतापर्यंत १२ प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत.

दोन स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की शहराबाहेरील लष्करी आणि गुप्तचर तळावर अजूनही तुरळक लढाई सुरू आहे. अशावेळी लढण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे काय हे अफगाणी नेतृत्वाला ठरवायचे असल्याचे व्हाइट हाऊसने सांगितले. गेली दोन दशके आपण ज्यांना प्रशिक्षण दिले, त्या अफगाणी राष्ट्रीय दलांजवळ लढण्यासाठी क्षमता आणि युद्धसाहित्य असल्याचे बायडेन प्रशासनाने सांगितले.

मात्र, बायडेन प्रशासनाचे हे मोठे अपयश मानले जात आहे. सुमारे वीस वर्षे प्रशिक्षण दिल्यावरही अफगाण फौजा तालीबान्यांचा काही आठवडेही मुकाबला करू शकली नाही. अमेरिकन गुप्तचर संस्थांचे हे अपयश आहे. मात्र, काहींच्या म्हणण्यानुसार इतक्या वर्षांत जर तालीबान्यांशी लढता आले नाही तर आणखी काही महिने किंवा वर्ष येथे सैन्य तैनात करून काय फायदा आहे?

The United States, which has left Afghanistan to its own destiny, will send troops back tosave American citizens

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात