लोकशाही वाचविण्यासाठी म्यॉनमारच्या सौंदर्यवतीने हातात घेतली रायफल


म्यानमारमधील लोकशाही वाचविण्यासाठी या देशातील एका सौंदर्यवतीने हातात रायफल घेतली आहे. लष्कराविरुध्दच्या सशस्त्र लढ्यात ती सहभागी झाली आहे. रायफलसोबत आपले फोटे तिने सोशल मीडियात पोस्ट केले आहे.The beautyqueen of Myanmar took the rifle in hand to save democracy


विशेष प्रतिनिधी

रंगुन : म्यानमारमधील लोकशाही वाचविण्यासाठी या देशातील एका सौंदर्यवतीने हातात रायफल घेतली आहे. लष्कराविरुध्दच्या सशस्त्र लढ्यात ती सहभागी झाली आहे. रायफलसोबत आपले फोटे तिने सोशल मीडियात पोस्ट केले आहे.

तारा टेट असे या सौंदर्यवतीचे नाव आहे. 2013 मध्ये तार टेटने मिस गह्यँड आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत म्यानमारचे प्रतिनिधित्व केले होते.म्यानमारमध्ये लोकशाहीवादी राजवट उलथवून लष्कराने हातीसत्ता घेतल्यानंतर 100 दिवसांनी 32 वर्षीय सौंदर्यवतीने बंड पुकारला आहे. आधुनिक शस्त्रांसोबत ती सैन्याच्या विरोधात उभा राहिली आहे.लष्कराविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आता ती स्थानिकांसोबत सहभागी झाली आहे.

क्रांती एखाद्या सफरचंदाप्रमाणे नाही की, तयार होताच स्वत:हून खाली पडेल. आपल्याला स्वत: लढावे लागेल आणि ही लढाई जिंकावी लागेल. पुन्हा एकदा लढण्याची वेळ आली आहे.

तुम्ही स्वत:जवळ एक शस्त्र, लेखणी किंवा कीबोर्ड ठेवा नाही तर लोकशाहीच्या समर्थनात उभे राहून आंदोलनासाठी पैसे दान करा. प्रत्येकाने विजयी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी संघर्ष कायम ठेवेल.

मी स्वत:च्या जिवाचे बलिदानही देण्यास तयार आहे, असे तार टेट टेटने पोस्टमध्ये लिहिले आहे. तार टेट टेट हिने आठ वर्षांपूर्वी 60 प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सौंदर्यवतीचा मुकुट पटकावला होता.

The beautyqueen of Myanmar took the rifle in hand to save democracy

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण