कोरोना उपचार आणि लसीकरणासाठी आधार बंधनकारक नाही, केंद्राचे स्पष्टीकरण


कोरोना उपचार आणि लसीकरणासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक नाही. आधारकार्ड नसल्याने कोणीही लस, औषधोपचार, इस्पितळात किंवा उपचारास नकार देऊ शकत नाही. आधारचा गैरवापर कोणतीही आवश्यक सेवा नाकारण्यासाठी करू नये, असे स्पष्टीकरण यूआयडीएआयने दिले आहे. Aadhar is not binding for corona treatment and vaccination, the center clarified


प्रतिनिधी

मुंबई : कोरोना उपचार आणि लसीकरणासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक नाही. आधारकार्ड नसल्याने कोणीही लस, औषधोपचार, इस्पितळात किंवा उपचारास नकार देऊ शकत नाही. आधारचा गैरवापर कोणतीही आवश्यक सेवा नाकारण्यासाठी करू नये, असे स्पष्टीकरण यूआयडीएआयने दिले आहे.

आधारकार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. मात्र, यूआयडीएआयने केलेल्या यंत्रणेनुसार 12 अंकी बायोमेट्रीक आयडी नसतानाही सेवा देण्याची सुविधा असेल. जर कोणत्याही रहिवाशांकडे एखाद्या कारणात्सव त्याचे आधार कार्ड नसेल, तरीही त्याला आधार कायद्यानुसार आवश्यक सेवा नाकरता येणार नाही. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरीही कोरोना लस, औषधे आणि रुग्णालयात भरतीही होता येईल.गेल्या काही दिवसांपासून आधार नसल्यामुळे काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला जात होता. तसेच अनेकांना अत्यावश्यक सेवाही नाकारल्या जात होते. यानंतर आधारने हा निर्णय घेतला आहे.

जर कोणाकडे आधार कार्ड नसेल किंवा काही कारणास्तव आधारची आॅनलाईन पडताळणी यशस्वी होत नसेल तर संबंधित एजन्सी किंवा विभागास आधार अधिनियम, 2016 मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट निकषानुसार त्याला सेवा द्यावी लागेल. तसेच जर एखाद्या रुग्णाला अशाप्रकारची सेवा नाकारली गेली किंवा लाभ देण्यात आला नाही, तर संबंधित विभागांच्या उच्च अधिकाºयाला ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे.

आधार हे केवळ जबाबदारी आणि जबाबदारीच्या सेवेसाठी आवश्यक आहे. आधारमुळे कोणाच्याही आवश्यक सेवांवर परिणाम होऊ नये, असे परिपत्रक 24 ऑक्टोबर 2017 रोजी जारी केले होते.

Aadhar is not binding for corona treatment and vaccination, the center clarified

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण