तालिबानी मंत्रिमंडळात तब्बल १४ मोस्ट वॉंन्टेड दहशतवाद्यांचा भरणा


विशेष प्रतिनिधी

काबूल – तालिबानच्या संभाव्य सरकारमध्ये ३३ मंत्री असून त्यातील १४ जण दहशतवादी आहेत. अनेक उपमंत्री व गव्हर्नर यांचा त्यात समावेश आहे. Taliban cabinate includes 14 most wanted terrorists

पंतप्रधान मुल्ला महमंद हसन आखुंद, मुल्ला अब्दुल घनी बरादर आणि मौलवी अब्दुल सलाम हनफी या दोन उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांची नावे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या काळ्या यादीत समाविष्ट आहेत. अमेरिकेने जाहीर केलेल्या इनामाच्या यादीतही त्यांची नावे आहेत. संरक्षण मंत्री मुल्ला याकूब परराष्ट्रमंत्री मुल्ला आमीर खान मुत्तकी आणि उपमंत्री शेर महंमद अब्बास स्टेनकजाई यांचाही दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, अल कायदाने अमेरिकेवर ९ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला केला होता. या घटनेला शनिवारी २० वर्षे पूर्ण झाली. अफगाणिस्तानमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीसाठी तालिबानने हाचा मुहूर्त शोधला होता, पण मित्र देशांच्या दबावामुळे घूमजाव करीत शपथविधीचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला.
तालिबानी सरकारच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य इनामुल्ला समांगनी याने ट्विटद्वारे ही माहिती दिली.

शपथविधीचा कार्यक्रम ९/११ च्या स्मृतीदिनी आयोजित केला तर त्यात सहभागी होणार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले होते.

Taliban cabinate includes 14 most wanted terrorists

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण