अफगणिस्थानात तालीबान्यांचे क्रौर्य, मुली, विधवांची पिळवणूक


विशेष प्रतिनिधी

काबुल : अफगणिस्थानातील बहुतांश भागावर कब्जा मिळविल्यावर आता तालीबान्यांच्या क्रौर्याच्या कहाण्या समोरय् येऊ लागला आहे. मुली आणि महिलांची पिळवणूक सुरू झाली असून महिलांना बुरखा सक्ती करण्यात आली आहे. बुरखा घातला नाही म्हणून एका महिलेला गोळ्या घालण्यात आल्या.Taliban atrocities, exploitation of girls and widows in Afghanistan

यादवीमध्ये २१८ जिल्ह्यांवर तालिबानींनी कब्जा मिळविला असून, लष्कराच्या ताब्यात फक्त १२० जिल्हे आहेत. गझनी प्रांतात तालिबानींनी शरियतचा कायदा लागू केला आहे. जिंकलेल्या बदखशन प्रदेशात १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुली व विधवा महिला यांच्यावर तालिबानींनी हक्क गाजवावा, असा फतवा काढण्यात आला.तालिबानींच्या ताब्यात आलेल्या भागात सुरक्षा जवानांच्या घरावर हल्ले चढविण्यात येत आहे. त्यांच्या संपत्तीची लुटालूट व कुटुंबीयांची बेअब्रू करण्यात येत आहे.शरियतचा कायदा लागू केला आहे. २५ वर्षांपूर्वी काबुल शहर जिंकल्यानंतर या संघटनेने असेच पाऊल उचलले होते.अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या यादवीमध्ये ३ लाख अफगाणिस्तानी नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.

इंटरनॅशनल ¸ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन या संस्थेने म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील सुमारे ४० हजार नागरिक इराणमध्ये पळून गेले आहेत. शेजारी देशांत आश्रयाला आलेल्या अफगाणिस्तानी निर्वासितांना कोरोना साथीचा फैलाव वाढल्यामुळे पुन्हा मायदेशी पाठविले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या तालिबान व अफगाणी लष्कराच्या ताब्यात अनुक्रमे २१८ व १२० जिल्हे आहेत. तालिबानकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये विदेशी दहशतवाद्यांचा मुक्त संचार आहे. पाकिस्तान, चीनमधील क्षीनजियांग, उझबेकिस्तानमधून आलेले अनेक दहशतवादी तालिबानला मदत करीत आहेत. या यादवीत अफगाणिस्तानी महिलांच्या अत्याचारांत वाढ झाली आहे. बाल्ख प्रांतात एका महिलेला कारमधून बाहेर काढण्यात आले. बुरखा घातला नसल्याने या महिलेची तालिबानींनी गोळ्या घालून हत्या केली.

Taliban atrocities, exploitation of girls and widows in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण