ऑस्ट्रियामध्ये कडक लॉकडाऊन, युरोप आणि जर्मनीलाही कोरोनाचा विळखा


विशेष प्रतिनिधी

ऑस्ट्रिया: युरोपला कोरोना महामारीचा विळखा बसला असून जगातील निम्मी लोकसंख्या युरोपमधील आहे. ऑस्ट्रिया कोरोनाविषाणू रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन पाळणार आहे. अशाप्रकारचे पूर्णपणे लॉकडाऊन करणारा हा पश्‍चिम युरोपमधील पहिला देश आहे.

Strict lockdown in Austria, Europe and Germany

फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे सरकारने सांगितले. लसीकरण न झालेल्या लोकांसाठी ऑस्ट्रियाने टाळेबंदी सुरू केली. परंतु कोरोना संसर्ग मात्र वाढत गेला. साल्झबर्ग आणि अप्पर ऑस्ट्रिया या प्रांतांनी स्वतःच लॉकडाऊन लादून ते राष्ट्रीय स्तरावरही टाळेबंदी करण्यासाठी दबाव आणतील असे गुरुवारी सांगितले. हिवाळा जवळ येत असून इच्छा नसतानाही सरकारला टाळेबंदीचा विचार करण्यास भाग पाडले गेले आहे. नेदरलँडमध्ये रात्री आठ वाजता रेस्टॉरंट आणि बार बंद करून अंशतः टाळेबंदी सुरू केली आहे.


Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…


या चौथ्या लाटेने युरोपची मोठी अर्थव्यवस्था जर्मनीला राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत आणले. आरोग्यमंत्री जेन्स स्पॅन यांच्या म्हणण्यानुसार केवळ लसीकरण केल्याने रुग्णांची संख्या कमी होणार नाही आहे. जर्मनी, झेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकियाच्या भागांमध्ये ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन भारतानेही लवकरच सावध व्हावे व रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी मास्क वापरणे, स्वच्छता राखणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे या नियमांचं पालन करणे गरजेचे आहे.

Strict lockdown in Austria, Europe and Germany

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात