अल कायदा आणि इसिससह ११ इस्लामी संघटनांवर श्रीलंकेत बंदी

विशेष प्रतिनिधी

कोलंबो : श्रीलंकेने अल कायदा आणि इसिससह ११ इस्लामी संघटनांवर बंदी घातली आहे. अॅटर्नी जनरल दाप्पुला डीलिव्हीरा यांच्या कार्यालयाने हा आदेश जारी केला आहे. Sri lanka bans Islamic organisations

राजधानी कोलंबोत २०१९ मध्ये ईस्टर संडेला तीन चर्चमधील आत्मघाती हल्ल्यात २७० नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर नॅशनल थोवहीत जमात या जिहादी गटासह इतर दोन संघटनांवर बंदी घालण्यात आली होती.जगात अनेक देशांत इस्लामी संघटना दहशतवादाला प्रोत्साहन देत आल्या आहेत. त्यामुंळे त्या त्या देशातील शांततेला मोठा धोका निर्माण झालेला आहे. काही देश अशा संघटनांवर कारवाई करतात. पण जगाच्या पाठीवर असे देश फारसे नाहीत. त्या पार्श्वभूमींवर श्रीलंकेने केलेली ही कारवाई साऱ्या इस्लामी जगताचे डोळे उघडणारी आहे.

Sri lanka bans Islamic organisations


वाचा आणखी महत्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*