रमजान महिन्यात मशिदींमध्ये नमाजाच्या परवानगीसाठी मुस्लिम नेत्यांचे राजेश टोपेंना साकडे; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी चर्चेचे टोपेंचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

मुंबई – रमझानचा पवित्र महिना पुढील आठवड्यात सुरू होत आहे. त्यावेळी मशिदींमध्ये जाऊन नमाज पठणाची परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. muslim leaders demands masques to be opend in ramadan month

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिमांना रात्रीच्या वेळी खास तारावीह नमाजसह मशिदींमध्ये नमाज पठणास परवानगी नाकारण्यात येऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मौलवी अथर अली, मौलाना खालिद अश्रफ, मुंबई अमन समितीचे प्रमुख फरीद शेख, समाजवादी पक्षाचे आमदार अबु आसिम आझमी आणि रईस शेख यांनी टोपे यांची भेट घेऊन मशिदी उघडण्याची मागणी केली.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन टोपे यांनी त्यांना दिले. लॉकडाउन हे रात्री १० वाजल्यापासून लागू करण्यात यायला हवे, जेणेकरून लोक रात्रीची नमाज पढून त्यांच्या घरी परतू शकतात, अशी सूचनाही मुस्लिम नेत्यांनी टोपे यांना केली आहे

राज्यातील सर्व मशिदींमध्ये जाऊन नमाज पढण्याची मुसलमानांना परवानगी देण्यात यावी. यावेळी सर्व लोक मास्कचा वापर करतील. तसेच ते शारीरिक अंतराचेही पालन करतील शिवाय सॅनिटायझरचाही वापर करतील, असे आश्वासन मौलवी अथर अली यांनी राजेश टोपे यांना दिले आहेत.

मशिदीत जाताना त्यांचे थर्मल तापमान देखील तपासले जाईल, असेही त्यांनी सांगितले. अली यांच्या व्यतिरिक्त टोपे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मौलाना खालिद अश्रफ, मुंबई अमन समितीचे प्रमुख फरीद शेख आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आसिम आझमी आणि रईस शेख यांचा सामावेश होता.

muslim leaders demands masques to be opend in ramadan month

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*