प्लेग पुन्हा डोकेवर काढणार; रुग्ण आढळल्याने जगभरात चिंता; जंगली उंदरांपासून फैलावतो

वृत्तसंस्था

मॉस्को : कोरोना संकटावर जग मात करत असताना  ‘ब्लॅक डेथ’या नव्या संकटाची चाहूल लागली आहे. ‘ब्लॅक डेथ’ हा कोणताही नवा आजार नसून तो प्लेग आहे. हा एक साथीचा आजार असून तो उंदरांपासून फैलावतो. Russian doctor warns that Black Death is re emerging

बदलते हवामान आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा आजार पुन्हा डोके वर काढत असल्याचा निष्कर्ष रशियातील वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे. रशियासह अमेरिका आणि चीनमध्ये प्लेगचे काही रुग्ण आढळून आले आहे.  प्लेगचा उद्रेक टाळण्यासाठी वेळीच हवामान बदलासंदर्भातील कृती करण्याचे आदेश युनिसेफने सर्व विकसित देशांना दिले आहेत.
काँगो प्रजासत्ताक, मादागास्कर आणि पेरू या तीन देशांमध्ये दरवर्षी प्लेगचे रुग्ण निदर्शनास येतात. सप्टेंबर ते एप्रिल या दरम्यान हा साथरोग तिथे डोके वर काढत असतो.



ब्लॅक डेथ म्हणजे प्लेग

ब्लॅक डेथ प्लेग हा आजार आहे. हा जुना साथरोग आहे.  १४ व्या शतकात युरोपातील ६० टक्के मृत्यू एकट्या प्लेगमुळे झाले होते.  तेव्हापासून युरोपीय देशांमध्ये प्लेगविषयी भीती निर्माण झाली आहे.

प्लेग कशामुळे होतो ?

जंगली उंदरांवर पोसल्या जाणाऱ्या माशांमुळे हा रोग पसरतो.हा साथरोग असून मानवाला त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. प्लेगमध्ये ताप येणे, थंडी वाजणे, उलट्या होणे, डोकेदुखी आणि अंगदुखी इत्यादी लक्षणे आढळून येतात.

प्लेगवर परिणामकारक लस नाही

प्लेग हा जुना आजार असून जगभरात या आजाराने कोट्यवधींचे बळी घेतले आहेत. भारतातही ब्रिटिश कार्यकाळात प्लेगचा फैलाव झाला होता. प्लेगचे निदान झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो.  प्लेगवर परिणामकारक लस निर्माण झालेली नाही. खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

Russian doctor warns that Black Death is re emerging

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात